एक्स्प्लोर

नाशिक, मुंबई, पिंपरीसह ठिकठिकाणी मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण आंदोलन

नाशिकच्या सीबीएस चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

मुंबई : मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि बीडमध्ये जागरण गोंधळ आंदोलन केलं. नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या सीबीएस चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

मुंबई

राज्याच्या विविध भागात मराठा समाजाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या आझाद मैदान येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवा, मराठा आरक्षण टिकवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारल्याने रस्त्यावरच हे आंदोलन करण्यात आलं.

पिंपरी-चिंचवड

तर पिंपरीत झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाबाबत सरकारने झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पिंपरी चिंचवडच्या डांगे चौकातही मराठा समन्वय समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरातही मराठा समन्वय समितीच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे चौकात हे आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं. बीडमध्येही चराटा फाटा याठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद

औरंगाबादेतील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं. आंदोलकांनी जागरण गोंधळ करत सरकारचा निषेध नोंदवला. विनापरवानगी आंदोलन केल्यानं पोलिसांनी 30 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं, तर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आंदोलकांना नेण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजीही केली.

जळगाव

मराठा समाज्याच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या, या सह 2015 मध्ये SEBC मधून नोकरीसाठी मराठा तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात उत्तीर्ण झालेल्या तरुणांना नोकरीचे आदेशही काढण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र या तरुणांना रुजू करून घेण्यात आले नाही. या सर्व तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी चाळीसगाव येथील मराठा समन्वय समितीच्या वतीने समन्वयक लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागरण गोंधळ करून आंदोलन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget