एक्स्प्लोर
मराठा मोर्चाचं वादळ आता परराज्यात, दमणमधील मराठी भाषिक रस्त्यावर

नंदुरबार : अहमदनगरमधील कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत मराठा क्रांती मोर्चे निघाले. आता मराठा मोर्चाचं वादळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात पाहायला धडकलं आहे. दमणमध्ये आज मराठा मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी भाषिक लोक गुजरात आणि दमणमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे दमण ग्रामपंचायतीत मराठा भाषिक लोकांचं प्रभाव पाहायला मिळतो. कोपर्डीच्या घटनेचा निषेध आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. विशेषतः महिलांचा आणि तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. दरम्यान, दमणनंतर आता गुजरात राज्यातील सुरतला मोर्चाची तयारी सुरु आहे.
Before You Go
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















