Nana patole : भाजपचे खूप आमदार येऊन आम्हाला भेटतात, त्यांच्यातही काही अलबेल नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही. भाजपच्या विरोधात कसं उत्तरं द्यायचं यावर आम्ही चर्चा करु. आपल्या नेत्यांशी भेटून राजकीय चर्चा करणं यात काही चुकीचं नाही, असंही नाना पटोले म्हणाले. भाजपला राज्यातील सरकार नको आहे, म्हणून अश्या खोट्या बातम्या देतात. आम्ही एकच लोह्याची मारु असा इशारा देखील पटोले यांनी दिली.


मी पोकळ धमक्या देणार नाही


2014 पासून या देशात अघोषीत आणीबाणी आहे. भाजप स्वतःची पाठ भाजप थोपटत आहे. मात्र आता भाजपला जनता धडा शिकवेल असेही पटोले म्हणाले. माझी स्टाईल स्टाईल राहणार आहे, मी पोकळ धमक्या देणार नाही असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
 
वकील लावले म्हणजे वकील आपला होतो असा प्रश्न नाही. सतीश उके यांनी माझ्या वतीने पेटीशन दिली आणि हाय कोर्टाने ती मान्य केली. भाजपच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याचं तोंड दाबायचे काम भाजप करत आहे. भाजप हुकूमशाही करत आहे, हिटलरशाही करत असल्याचे पटोले म्हणाले. वकिलाकडे ज्या फाईल्स असतात त्या सगळ्या जप्त केल्या असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. नागपूरच्या ईडीकडे याबाबत माहिती का नाही? हा दबाव कश्यासाठी? सध्या ईडीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. अनेकवेळा आमचे फोन टॅप झाले आहेत. जर आमच्यावर खोट्या कारवाया करायच्या असतील तर करा असेही ते म्हणाले.


भाजपला पर्याय काँग्रेस हाच आहे. आज आम्ही भाजपच्या अत्याचारा विरोधात कसं लढायचं याबाबत चर्चा करणार असल्याचे पटोले म्हणाले. आमच्या पक्षात काय करायचं हे आम्हाला माहित आहे असेही पटोले यावेळी म्हणाले. हे प्रश्न तुम्ही वारंवार विचारुन जनतेचे प्रश्न बाजूला राहतात असेही पटोले यांनी सांगितलं.


कोकण मागासलेला आहे, तसा विदर्भही आहे. दोन बाजू पाहायला मिळतात. काही लोकं राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा नाणार व्हावा ही त्यांची मागणी होती. यामुळं निसर्गाला धोका तर नाही ना, कोकणाची शोभा जाणार नाही ना हे तिथल्या लोकांशी बोलून ठरवलं पाहिजे नाहीतर विदर्भ आहेच असेही पटोले यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: