औरंगाबाद Aurangabad News Updates: येत्या शैक्षणिक वर्षामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आवश्यक आहे. सर्व शाळांनी सीसीटीव्ही बसवून शिक्षण विभागास अहवाल सादर करण्याचे आदेश औरंगाबादच्या शिक्षण विभागाने दिलेत. शाळेमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराबाबत अलीकडे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला केली होती. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता आदेश काढण्यात आले आहेत.


सीसीटीव्ही बसवण्याबाबत खाजगी शाळा व्यवस्थापनाने कार्यवाही करावी, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना आवश्यकता असलेल्या ठिकाणी बसविण्यात यावेत, सीसीटीव्ही यंत्रणा सुरळीत कार्यरत राहील यासाठी त्याची वेळोवेळी देखभाल करण्याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही असेही सांगण्यात आले आहे.


राज्यभरातील 1 हजार 624 शाळांमध्ये CCTV


नुकत्याच झालेल्या अधिवेशनात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत महत्वाची घोषणा केली होती. त्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत वर्षा गायकवाड यांनी सभागृहात माहिती दिली होती. सद्यस्थितीत राज्यभरातील 1 हजार 624 शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवले असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


 



इतर महत्वाचा बातम्या 


CCTV In School : राज्यातील सर्व शाळांमध्ये CCTV बसवणार, शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांची घोषणा


पोलीस स्टेशन्समधील खराब CCTV वरुन राज्य सरकारची खरडपट्टी.. बिलो टेंडरचा आग्रह जनतेच्या पैशाची उधळपट्टी : मुंबई हायकोर्ट



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI