एक्स्प्लोर

Mantralay Security: राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाला उच्च सुरक्षेच कवच; मंत्रालयाच्या भोवती असणार घातक एलिट गार्डचे संरक्षकांचे कडे

Mantralay Security मुंबई: मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्याचा संभाव्य धोका लक्ष्यात घेता, आता मंत्रालयाला पोलिसांच्या 'एलिट गार्ड' या अत्यंत घातक कमांडोचे संरक्षक कवच देण्यात आले आहे.

Mantralay Security मुंबई: संपूर्ण राज्याचा राज्यकारभार चालणाऱ्या मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्याचा संभाव्य धोका लक्ष्यात घेता, आता मंत्रालयाला पोलिसांच्या 'एलिट गार्ड' (Elite Guard)या अत्यंत घातक कमांडोचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. डोळ्याला काळा गॉगल, हातामध्ये एके-47 आणि उजव्या हाताचे एक बोट बंदुकीच्या 'ट्रिगर'वर अशा सदैव सज्जतेमध्ये हे कमांडो सध्या मंत्रालयातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. (Mantralay Security Elite Guard) 

मुंबईसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांना सध्या मोठा धोका आहे. मंत्रालयाला तर सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आता तर मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर प्रत्येकी एक-एक एलिट गार्डमधील प्रशिक्षित कमांडो तैनात केला आहे. त्याच्या हातात एके-47 सारखे अत्याधुनिक शस्त्र दिलेले आहे. यांची नजर फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या हालचालींवर असते. तिहेरी सुरक्षा कवच मंत्रालयाला तिहेरी सुरक्षा कवच आहे.

'एलिट गार्ड' म्हणजे कोण? (Mantralay Security Elite Guard) 

एलिट गार्ड किंवा एलिट पोलीस फोर्स ही पोलीस दलातील विशेष पोलिसांची प्रशिक्षित तुकडी असते. या तुकडीतील कमांडोंचा वापर दहशतवादी कारवायांच्या विरोधात आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि अत्यंत गोपनीय आणि उच्च दर्जाच्या मोहिमांमध्ये वापर केला जातो. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचे विशेष प्रशिक्षण या तुकडीला दिले गेलेले असते. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात एलिट पोलीस फोर्स हे आता कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहे.

ATS : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे उत्तरप्रदेशमध्ये छापेमारी

दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे उत्तरप्रदेशमध्ये छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. वाराणसीतील आदमपूर पोलीस ठाणे हद्दीतील पठाणी टोला भागात ATS ने हि छापेमारी केली आहे. या कारवाईत डॉ. आरिफ अन्सारी आणि त्यांचा मुलगा अबू बक्र हे या प्रकरणात सहभागी असल्याचा ATS ला संशय आहे. ATS पथकांने त्यांच्या घराची सखोल झडती घेत, घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात संशयास्पद आर्थिक व्यवहार, परदेशातून येणारा निधी किंवा हवालाच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत असून यांचा तपास ATS कडून केला जात आहे. तर संशयितांचे बँक व्यवहार, डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि संपर्क व्यक्ती यांची खात्री ATS कडून केली जात आहे. तसेच त्यांचा कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र आणि वाराणसी ATS कडून ही संयुक्त कारवाई करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
भाजपनं आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला हाताशी धरलंय, रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडं? म्हणाले,  डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला संविधान बदलायचंय
भाजपनं आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला हाताशी धरलंय, रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडं? म्हणाले,  डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला संविधान बदलायचंय

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Embed widget