मुंबई : सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात करुन विजय मिळवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) रोहित पवारांच्या (Rohit Pawar ED Enquiry) ईडी चौकशीवर दिली आहे. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांना सोबत होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले असून त्यांची चौकशी सुरु आहे. रोहित पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंसोबत ईडी कार्यालयात गेले. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांना सोबत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्याकरता संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू. सत्याच्याच मार्गानं चालण्याचा यशवंतराव चव्हाणांचा वारसा आम्ही चालवतोय. आमच्या लढाईल दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातोय.
इनकम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या 90 ते 95 टक्के केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात : सुप्रिया सुळे
केंद्राच्या एका अधिकृत डेटानुसार इनकम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या 90 ते 95 टक्के केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आहे. रोहितनं संघर्षयात्रा काढली होती. कदाचित हे त्याचंच सूडाचं राजकारण असू शकतं. हे शक्तीप्रदर्शन नाही. यात प्रेम आणि नाती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांच्या भावासाठी इथे यावंसं वाटतंय.
आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही. यावेळी मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत असतात त्यांनी जी कागदपत्रं मागवली ती मी दिली आहे. मी एवढचं सांगेन अधिकारी त्यांचं काम करत असतात त्यांनी जी कागदपत्रं मागवली ती मी दिली आहे. पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करेल. आम्ही एका बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत म्हणून कदाचित ही कारवाई झाली असेल.
जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार : रोहित पवार
चौकशीनंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनासाठी पुन्हा लढण्यासाठी तयार असू. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांनी चालणारा मी एक मराठी माणूस आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे जे काही सहाकार्य करायचं ते करेनचं पण पळून जाणार नाही. जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहीन असंही पवार यांनी म्हटलं.
हे ही वाचा :