जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई (Mumbai) आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या अध्यादेशावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रमुख्य मागण्या मान्यच झाल्या नसून, अध्यादेशातून मराठा समाजाची फसवणूक झाली असल्याचा देखील आरोप केला जात आहे. दरम्यान, अशा प्रकारे टीका करणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहेत. 'मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून, त्यामुळे सर्वच मराठा समाजाला याचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही लोकं चुकीची अफवा पसरवत आहेत. पण लक्षात ठेवा मराठवाड्याला कचून आरक्षण मिळणार असून, मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून (Maratha Reservation) वंचित राहणार नसल्याचं' मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे आजपासून रायगड दौऱ्यावर असून, आंतरवाली सराटीतून निघतांना त्यांनी पत्रकारांशी बोलतांना हे वक्तव्य केले आहे. 


दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,"आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रायगडावर चाललो आहे. उद्या रायगडावर जाऊन शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होणार आहे. सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबत अध्यादेश काढला आहे. मराठा बांधवांना आणखी यात काही मांडायच असेल, तर हरकती मांडा. मराठवड्यात कमी नोंदी असल्याने गॅझेट घ्यायचं सरकारला सांगितलं आहे. मराठवड्यातील एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही. या कायद्याच्या मार्फत अंमलबजवणी आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार आहे.  या अधिसूचनेवर हरकती मागवण्यासाठी 15 दिवस आहेत. सगेसोयरे हा अंतिम शब्द आहेत आणि यापासून लाखो लोकांचा फायदा होणार असल्याचे" जरांगे म्हणाले. 


मराठ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम करू नका...


दरम्यान याचवेळी मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. "ओबीसी नेते बैठक घेत आहे, पण आता काहीच होणार नाही. आता राजपत्र निघालेलं आहे. भुजबळ यांना तेच काम आहे. लोकांच्या अन्नात माती कालवण्याचं काम आम्ही करत नाही, असे म्हणत भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी टीका केली आहे. तसेच, ओबीसी नेते आमच्यावर अन्याय होत असल्याचं म्हणत आहे. मात्र, आमच्यावर देखील खूप दिवस अन्याय झाला असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच ओबीसी नेते आंदोलन करत असतील तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे" सुद्धा जरांगे म्हणाले.


सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा...


मराठा समाजाचे जेवढे अभ्यासक आहेत,वकील आहेत, नेते आहेत, आंदोलक असतील, त्यांनी आता अध्यादेशावर काही हरकती मांडता येत असतील तर त्या मांडल्या पाहिजे. यामुळे कायदा आणखी पक्का होईल. काही लोकं उगाच गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडल्या पाहिजे. सोशल मीडियावर लिहित बसण्यापेक्षा अध्यादेशावर हरकती लिहल्या पाहिजेत. घरी गोधड्या मांडून बसण्यापेक्षा हरकती मांडा असेही जरांगे म्हणाले. तसेच, काही अधिकाऱ्यांनी नोंदी शोधतांना हलगर्जीपणा केल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तालुका पातळीवर नेमलेल्या समित्या सक्रिय करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : मनोज जरांगे रायगडावर गुलाल उधळणार; असा असणार संपूर्ण दौरा...