एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धावत्या लोकलमध्ये स्टंट, तरुणाने दोन्ही पाय गमावले
पिंपरी-चिंचवड : लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण बचावला. पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे.
सचिन डुलगज हा तरुण देहुरोड रेल्वे स्टेशनवरुन लोणावळा-पुणे या लोकलने प्रवास करत होता. मात्र रेल्वेत स्टंटबाजी करण्याच्या नादात तो खाली कोसळला आणि पाय रेल्वेखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमवावे लागले.
याआधी कामशेत रेल्वे स्टेशनवरील स्टंटबाजी नंतर एबीपी माझाने तो व्हिडिओ दाखवून तरुणांना असं कृत्य न करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र काही टवाळखोर तरुणांना याचं काहीच सोयरसुतक नसल्याचं या घटनेने पुन्हा समोर आलं आहे.
सचिनचं नशिब बलवत्तर म्हणून आलेलं मरण त्याच्या पायांवरच निभावलं. मात्र लोकलमध्ये स्टंटबाजी करणारे या घटनेपासून काही धडा घेणार का? हा कायम प्रश्न आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement