Rshuffle in Congress Organization : लोकसभेसाठी काँग्रेसने कात टाकली, अनेक राज्यांमध्ये फेरबदल; महाराष्ट्राला सुद्धा प्रभारी मिळाले!
Major Rshuffle in Congress Organization : रमेश चेनिथल्ला यांना महाराष्ट्राचे प्रभारी आणि मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. केसी वेणुगोपाल हे सध्या संघटनेचे सरचिटणीस असतील.

Major Rshuffle in Congress Organization : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना यूपी काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे. आता प्रियांका गांधी यांच्याकडे कोणत्याही राज्याची जबाबदारी नाही. त्याचबरोबर सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे.
कुमारी सैलजा यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश चेनिथल्ला यांना महाराष्ट्राचे प्रभारी आणि मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. केसी वेणुगोपाल संघटनेचे सरचिटणीस असतील. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी तर रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत रमेश चेनिथल्ला?
दरम्यान, कर्नाटकमध्ये एच. के. पाटील मंत्री झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारी पद रिक्त होतं. यानंतर आता रिक्त पदावर रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी चेन्नीथल्ला प्रभारी म्हणून काम पाहतील.
Congress President Shri @kharge has assigned the organisational responsibilities to the following persons with immediate effect. pic.twitter.com/qWhwiJzysj
— Congress (@INCIndia) December 23, 2023
अजय माकन हे एआयसीसीचे कोषाध्यक्ष
ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची कम्युनिकेशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अजय माकन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) कोषाध्यक्ष असतील. पक्षाने 12 सरचिटणीस आणि 11 राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तत्काळ प्रभावाने सर्व लोकांकडे संघटनात्मक पदे सोपवली आहेत.
संघटनात्मक पुनर्रचनेसोबतच, काँग्रेस आपला पाया मजबूत करण्यासाठी तळागाळात अनेक पावले उचलण्याचा विचार करत आहे. नुकत्याच झालेल्या पाच पैकी चार विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षातील फेरबदल हे मे 2024 पूर्वी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
