मुंबई : एबीपी माझाच्या माझा सन्मान 2019 या पुरस्कार सोहळ्यामध्ये आज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री राधिका आपटे, ज्येष्ट समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, चित्रकार शशिकांत धोत्रे, विको लॅब्रोटरीजचे संजीव पेंढारकर, अनुवादिका उमा कुलकर्णी, समाजसेवक गिरीश प्रभुणे, कुस्तीपटू राहुल आवारे यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.


अभिनेत्री माधुरी दीक्षित : हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. नुकतेच 'बकेट लिस्ट' या चित्रपटाद्वारे माधुरीने मराठीत डेब्यू केला आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी : ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. कोकणपट्टा ते कॅलिफोर्नियापर्यंत जगभरात त्यांचे लाखो अनुयायी पसरले आहेत. वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचा सात दशकांचा वारसा आप्पासाहेब तेवढ्याच समर्थपणे आणि निष्ठेने चालवत आहेत.

उषा मंगेशकर : ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. उषाताईंनी मराठी, हिंदी, बंगाली, कानडी, गुजराती आणि भोजपुरी भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत.

अभिनेत्री राधिका आपटे : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

अभिनेता सिद्धार्थ जाधव : अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

राहुल आवारे : कुस्तीपटू राहुल आवारे याचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारताचा तिरंगा डौलाने फडकवणारा पैलवान राहुल आवारे यंदाचा क्रीडाक्षेत्रातला 'माझा सन्मान' पुरस्काराचा मानकरी ठरला.

गिरीश प्रभुणे : समाजसेवक गिरीश प्रभुणे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रभुणे यांनी भटक्या विमुक्त समुदायासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले आहे. उपेक्षित घटकांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना माझा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.

चित्रकार शशिकांत धोत्रे : जागतिक स्तरावर नावजलेले चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

उमा कुलकर्णी : अनुवादाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अनुवादिका उमा कुलकर्णी यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मंगला बनसोडे : लोककलावंत मंगला बनसोडे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. लावणी या लोककलेसाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे.

डॉ. जयेश बेल्लारे : मधुमेहसंबंधी संशोधन करणाऱ्या डॉ. जयेश बेल्लारे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

संजीव पेंढारकर : विको लॅब्रोटरीजचे संजीव पेंढारकर यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. आयुर्वेद आणि उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.