मुंबई : महाराष्ट्रातील धगधगत्या प्रश्नांवर तसेच भविष्याचा वेध घेण्यासाठी Majha Maharashtra Majha Vision 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समस्यांवर तसेच राजकीय उहापोह करण्यासाठी राज्यातील दिग्गजांना माझाच्या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माझाच्या व्यासपीठावर भाजपची (BJP) आणि महाराष्ट्रावर (Maharashtra) भूमिका मांडली. यावेळी भाजपकडून भ्रष्ट नेत्यांना घालण्यात येत असलेल्या पायघड्यांवर आशिष शेलार यांना बोलते करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेक प्रश्नांवर शेलार यांनी कन्विक्शन रेट, यांनाच विचारा, त्यांनाच विचारा, कृष्णनीती, चाणक्य नीती असे शब्दप्रयोग करत उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
तुमच्या वाॅशिग पावडरचा नेमका ब्रँड कोणता?
आशिष शेलार यांना भाजपमधील आरोप केलेल्यांचे सरसकट इनकमिंग तसेच आयारामांमुळे होत असलेली पक्षांतर्गत खदखद, माधव भंडारी यांच्या मुलाने व्यक्त केलेली नाराजी याबाबतही विचारण्यात आले. यावेळी तुमच्या वाॅशिग पावडरचा नेमका ब्रँड कोणता? किरीट सोमय्या, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पांढऱ्या कपड्यावर वाट्टेल ते डाग लावले, यामध्ये अशोक चव्हाणांसह अजित पवार आणि शिंदे गटातील सगळे आरोप करणारे सोबत आहेत याबाबत विचारण्यात आले असता शेलार यांनी कन्विक्शन रेटचा मुद्दा उपस्थित करत एकप्रकारे समर्थन केले.
ते म्हणाले की, ज्यांच्यावर आरोप झाले ते पक्षात आले आहेत किंवा मित्र पक्षात आहेत त्यामध्ये दोषी आरोपी कोणीच नाही. यानंतर त्यांना नवाब मलिक यांच्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी त्यांच्यावरील गंभीर आरोप असल्याचे सांगत तुलना योग्य नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीवर आरोप झाल्यानंतर तीन दिवसात अजित पवारांनी भाजपशी जाण्यासोबत विचारले असता त्यांनी या प्रश्नाचेही थेट उत्तर न देता त्यांनाच विचारा, असे म्हणत अधिक उत्तर दिले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या