Majha Maharashtra Majha Vision 2020 : केंद्राच्या संस्था नियमांप्रमाण कारवाई करत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात धुवुन मागे लागू अशा धमक्या देत आहेत. घटना जाणून घ्या, कारभाराची एबीसीडी यांना माहित नाही. महाराष्ट्र्रासारख्या प्रगत राज्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे दुर्देव आहे, असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाजप खासदार नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) बोलत होते. तुम्ही गद्दारी करुन मुख्यमंत्री झाला आहात. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात जाण्याची भाषा करु नका, असंही ते म्हणाले. उद्धवस्त रस्ता न पकडता विकासाचा रस्ता पकडा. गोरगरीबांना तारण्याचं काम करा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.
सामनाचे मालक आहेत म्हणून सामनातून मुलाखत देऊन धमक्या देणं योग्य नाही, असं राणे म्हणाले. ते म्हणाले की, सरकारचं स्टेरिंग यांच्या हाती आहे असं ते सांगतात. त्यांच्या हाती गाडीचे स्टेरिंग आहे. ते ड्रायव्हर आहेत, पंढरपूरला जातात. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नकोय तर चांगला मुख्यमंत्री हवा आहे. महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या मोठं होण्यात व्यक्तिगत काय योगदान आहे? असा सवाल देखील राणे यांनी केला.
राज्य उद्योगासाठी सुरक्षित नाही. आज वीजेच्या बिलावरुन महाराष्ट्र पेटलाय. शेतकऱ्यांना संपवायचं काम सुरु आहे. मुख्यमंत्री काय करतात, नुसतं हात धुवायला जातात का असा सवालही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हाती गाडीचं स्टेरींग आहे, राज्याचं नाही. महाराष्ट्राला ड्रायव्हर द्यायचा नव्हता, मुख्यमंत्री द्यायचा होता. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री राज्याला मिळाले. महाराष्ट्राला ही सत्ता पोषक नाही. हे सरकार गेल्यानंतर दोन मार्ग आहेत. दोन पक्षापैकी एक पक्ष येईल किंवा राष्ट्रपती राजवट लागू शकेल, असं राणे म्हणाले. राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं असं राणे म्हणाले.
राठ्यांना आरक्षण द्यावं असं उद्धव ठाकरेंना वाटत नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात राजकरण करु नये. सुप्रीम कोर्टात ज्या तोडीचे वकील देण्याची गरज होती, तसे वकील दिले नाही. मराठ्यांना आरक्षण द्यावं असं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना वाटत नाही. ते या विरोधात होते, असा आरोपही राणेंनी केला आहे. मराठ्यांना त्वरीत आरक्षण लागू होणं गरजेचं आहे, स्टे लवकर उठला पाहिजे, असंही ते म्हणाले.
राणे म्हणाले की, मला कुणाच्या वारसाबद्दल बोलायचं नाही. शरद पवारांचा वारस कोण असणार हे शरद पवार ठरवतील, आम्हाला ते काम नाही, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
वीजबिल माफीचं काय? 'राज्याचे पैसे केंद्रानं अडवले!', आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने