#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन :  वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. वाढीव वीज बिल माफी करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती. वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे. वीजबिलमाफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.


केंद्रानं हक्काचा पैसा दिलेला नाही


यावेळी त्यांनी सांगितलं की, राज्यसरकारनं 10 हजार कोटी अतिवृष्टी, महापुरावर खर्च केला. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशोक चव्हाण यांनी अपुऱ्या माहितीवर वक्तव्य केलं, असं नितीन राऊत म्हणाले. वीजबिलासाठी राज्य सरकारमधलं कुणीही अडचण आणत नाही. प्रश्न अर्थव्यवस्थेचा आहे. 29 हजार कोटी केंद्राकडे जीएसटीचे स्थगित. राज्याच्या तिजोरीवर भार आहे. राज्य सरकारकडे हा निर्णय प्रलंबित आहे. कॅबिनेट नोट लाईव्ह आहे, असं ते म्हणाले. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. केंद्रानं हक्काचा पैसा दिलेला नाही. राज्याने सगळी तिजोरी कोरोनाकडे वळवली आहे, असं राऊत म्हणाले.


ऊर्जा खातं वीज पुरवठा आणि वीज निर्मितीसाठी कर्ज काढतं. वीजबिलमाफीसाठी कर्ज घेत नाही. राज्य सरकार कधीही वीज बिल माफी करु शकतं. विरोधी पक्षानं केंद्राच्या विरोधी आंदोलन करावं. राज्य सरकारचा हक्काचा पैसा मागण्यासाठी त्यांनी राज्याची बाजू घ्यावी, असं ते म्हणाले.



दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर 


नव्या सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होतंय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


असा असेल कार्यक्रम


सकाळी 10 वाजता - नितीन राऊत वि. चंद्रशेखर बावनकुळे


सकाळी 10.30 वाजता - सुभाष देसाई


सकाळी 11 वाजता - अशोक चव्हाण


सकाळी 11.30 वाजता - एकनाथ शिंदे


दुपारी 12 वाजता - बाळासाहेब थोरात


दुपारी 12.30 वाजता - चंद्रकांत पाटील


दुपारी 1 वाजता - जयंत पाटील


दुपारी 1.30 वाजता - राजेश टोपे


दुपारी 2 वाजता - नारायण राणे


दुपारी 2.30 वाजता - वर्षा गायकवाड


दुपारी 3 वाजता - देवेंद्र फडणवीस


दुपारी 4 वाजता - हसन मुश्रीफ


दुपारी 4.30 वाजता - गुलाबराव पाटील


दुपारी 5 वाजता - आदित्य ठाकरे