यवतमाळ : यवतमाळमधील शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या मेनलाईन परिसरातील  'बँक ऑफ महाराष्ट्र'  बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेत दरोडा  टाकला. बँकेतील जवळपास 4 लाख 80 हजार  रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.


यवतमाळमधील शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या मेनलाईन परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी या शाखेच्या बाजूला असलेल्या बोळीतून पाईपच्या साहाय्याने वर चढत एक्झॉर्स फॅन तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील एका पाठोपाठ एक कपाट उघडले. मात्र, हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी थेट लॉकर असलेल्या रूमचे कुलूप तोडले. लॉकरमधील जवळपास 4 लाखांची रोख लंपास केली. ही बाब उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, ठाणेदार नंदकुमार पंत, सहायक पोलिस निरिक्षक जनार्दन खंडेराव यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहाणी केली. दरम्यान श्वानपथक, फिंगरप्रिंट एक्सपर्टला पाचारण करण्यात आले होते.  शहर पोलिस ठाण्यात गुन्ह नोंद झाला आहे.


शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून लाखोंची रोख लंपास करणारे चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यांच्या चेहरा रूमालाने बांधून असल्याचे यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील इतर सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा आधार पोलिसांकडून घेत असून, या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर  आहेत.


संबंधित बातम्या :