Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amlaner) येथील जी एस हायस्कूल या शाळेत अवकाश निरीक्षण केंद्र (Space studies Center) उभारण्यात आले आहे. नाशिक (Nashik) विभागात पहिल्यांदाच अशा प्रकारचं अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यात आलेली ही पहिलीच शाळा ठरल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे
    
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर येथील जी एस हायकुल ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षणा साठी विविध उपक्रम राबवित असते. अशाच एका उपक्रमाच्या अंतर्गत या शाळेत ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खगोल शास्त्राचा अभ्यास करता यावा यासाठी अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे या साठी अमळनेर शहरातील रहिवासी असलेले तेजस्विता भंडारी वैद्य यांनी  कै रघुनाथ भंडारी या आपल्या वडिलांच्या स्मृती निमित्ताने अडीच लाख रुपये खर्च करून हे निरीक्षण केंद्र उभे केले आहे. 


ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या शाळकरी मुलांच्या मध्ये खगोल शास्त्राचा ज्ञान वाढावं,त्यांच्यात या विषयाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचं तेजस्विता यांनी म्हटल आहे.  या अवकाश निरीक्षण केंद्रात अत्याधुनिक पद्धतीच्या दुर्बिणी लावण्यात आल्याने मंगळ,गुरू आणि शुक्र सह चंद्राचे सुस्पष्ट दर्शन घेता येत असल्याने विद्यार्थांना ही या ग्रहांच निरीक्षण करण्याची आणि अभ्यास करण्याची संधी मिळाली असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


नाशिक विभागातील पहिलं अवकाश निरीक्षण केंद्र 


अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलमधील अवकाश निरीक्षण केंद्रामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, नाशिक विभागातील अवकाश निरीक्षण केंद्र असलेली पहिली शाळा असल्याचा बहुमान शाळेला प्राप्त झाला आहे. जवळपास अडीच लाख रुपये खर्चून हे अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यात आले असून, यात अत्याधुनिक दुर्बिणीचा समावेश आहे. यावेळी रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी लंडनचे सहकारी तथा थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे शिष्य विशाल कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना अवकाश, ग्रह, तारे तसेच त्यासंबंधी घडणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती दिली. त्यातून शुक्र, मंगळ, गुरू तसेच इतर ग्रह आपण सहजरित्या पाहू शकतो. भंडारी व वैद्य परिवाराच्या आर्थिक मदतीतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. 


अवकाश संशोधकांसाठी पर्वणी


अवकाश अभ्यास केंद्रात लहान-मोठ्या दुर्बिणी बसविण्यात आल्या आहेत. अवकाश निरीक्षण केंद्रात बसविण्यात आलेल्या दुर्बिणीतून अवकाशाचे दर्शन करता येते. विशेष म्हणजे दुर्बीण असल्याने अवकाशात कोणता ग्रह दिसतो, याची माहिती मॉनिटरवर दिसत असल्याने मुलांना माहिती मिळते आहे. जो ग्रह-तारा आपणास पाहावयाचा आहे, तो निश्चित केल्यानंतर दुर्बिणीतून तो स्पष्टपणे पाहता येतो.