Bharatshet Gogawale Profile in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे आली. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली. यात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार भरतशेट गोगावले यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आजवरच्या त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीबाबतची माहिती जाणून घेऊया...


सरपंच पदापासुन राजकीय कारकिर्दला सुरुवात


भरत मारूती गोगावले हे मुळ राहणार रायगड जिल्ह्यातील पिंपळवाडी, ता. महाड येथील रहिवासी असून सद्या ते शिवनेरी, मु. ढालकाठी, पो. बिरवाडी, ता. महाड, जि. रायगड येथे वास्तव्यास आहेत.  भरत गोगावले यांनी त्यांच्या महाड तालुक्यातील पिंपळवाडी ग्राम पंचायतीचे सरपंच पदापासुन राजकीय कारकिर्दला सुरुवात केली. त्यानंतर ते पिंपळवाडी गावचे ते बिनविरोध सरपंच झाले होते. त्यांचा जन्म 01 जुन 1963 रोजी गरीब शेतकरी कुटूंबात झाला. वडिलांच्या निधनानंतर मोठे पुत्र म्हणून त्यांच्या अंगावरती कुटूंबाची जबाबदारी आली. नंतर शिक्षण अर्धवट सोडून  त्यांनी नोकरी व्यवसाय, समाजसेवा आणि नंतर राजकारणामध्ये प्रवेश केला.


सरपंच, जिल्हा परिषद ते सलग विधानसभेत विजयाचा चौकार


- 1987 ते 1992 ते महाड पंचायत समितीचे ते सदस्य म्हणून राहिले. 


- 1996 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना या पक्षात प्रवेश केला.


- त्यानंतर ते रायगड जिल्हा परिषद निवडणूकीत दोन वेळा ते विजयी होत आले होते


- तसेच त्यांनी रायगडचे शिवसेना जिल्हा प्रमुख पदही भुषवले होत


-1992 ते 1997 पहिल्यांदा रायगड जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले.


- त्यानंतर त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या कृषि व पशु सभापती पद देण्यात आले.


- 2007 ते 2009 रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती पद त्यांनी भुषवल.


-2009 मध्ये महाड विधानसभा मतदार संघातुन त्यांनी शिवसेनेतून आमदारकी लढवत पहिला विजय मिळवला 


-त्यानंतर आतापर्यंत सलग तीन टर्म ते आमदार म्हणून कार्यरत आहेत.


2019 मध्ये शिवसेनेच्या उपनेते पदी निवड


201 9च्या विधानसभा निवडणूकीत जिंकून आल्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा बंडात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांचा खारीचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात शिंदेंचे तीन आमदार निवडूण आल्यानंतर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आल्यानंतर भरत गोगावले यांनी पालकमंत्री हटाव आणि राष्ट्रवादी हटाव मोहिम आखली होती.


विधानसभा निवडणूकीत विजयाचा चौकार


2024 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी शिवसेना विरूद्ध शिवसेना लढतीत ठाकरेंच्या स्नेहळ जगताप कामथ यांना 26 हजार मतांनी पराभूत करून विजयाचा चौकार मारला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची शिंदेच्या मंत्रिमंडळात वर्णी लागता लागता राहून गेली.त्यांना मंत्री पदाचे कोट ते हुकलेले मंत्री पद अशा टिकांना सामोरे जावे लागले. त्यांच्या पत्नी सौ. सुषमा गोगावले  हे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत.


हे ही वाचा