एक्स्प्लोर

'महावितरण'च्या वीजदरात प्रतियुनिट 8 पैसे दरवाढीचा प्रस्ताव

'महावितरण'ने सुमारे 34 हजार 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे.

मुंबई : 'महावितरण'च्या वीजदरात प्रति युनिटमागे केवळ 8 पैशांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. वीजदरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता तूर्तास टळली आहे. 'महावितरण'ने सुमारे 34 हजार 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावात राज्यातील सुमारे 1.20 कोटी ग्राहकांच्या वीजदरात केवळ 8 पैसे एवढी अत्यल्प दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या याचिकेत राज्यात येणाऱ्या नवीन उद्योजकांना प्रतियुनिट एक रुपया सवलत, ऑनलाईन वीजबील भरणाऱ्या वीजबिलांवर 0.5 टक्के सूट प्रस्तावित आहे. याशिवाय 2019-20 वर्षासाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. महावितरण कंपनीची आर्थिक व्यवहार्यता टिकवून ठेवणे, महागाई निर्देशांकाच्या अनुषंगाने विविध खर्चाचा आढावा, महावितरणच्या वीजयंत्रणेच्या संचालन, दुरुस्तीवरील वाढता खर्च आणि ग्राहकसेवेसाठी पायाभूत आराखड्या अंतर्गत करण्यात येत असलेली मोठी कामं, महावितरणच्या नियंत्रणाबाहेर असलेले विविध घटकांमुळे निर्माण होणारे वाढीव खर्च यासारख्या कारणांसाठी प्रस्तावित दरवाढ आवश्यक आहे. ग्राहक वर्गवारीनिहाय वीजवापरातील बदल आणि 2015-16 आणि 2016-17 दरम्यान मुक्त प्रवेश वापरात झालेली वाढ यामुळे महावितरणच्या महसूलावर विपरित परिणाम झाला असून महसुली तूट निर्माण झाली आहे.
महावितरणला विक्रमी 30 हजार कोटींचा तोटा, तुमचं लाईट बिल वाढणार!
महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांमध्ये 0 ते 100 युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 1.20 कोटी आहे. वीजआकार आणि वहनआकार यांचा एकत्रित विचार केल्यास 0 ते 100 युनिट या वर्गवारीत आर्थिकवर्ष 2018-19 मध्ये लागू असलेल्या (प्रति युनिट 4.25 रुपये) दरात 8 पैसे एवढीच अत्यल्प वाढ (प्रति युनिट 4.33 रुपये) आर्थिक वर्ष 2018-19 साठी प्रस्तावित केली आहे. ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्याकरीता महावितरणने जे लघुदाब ग्राहक ऑनलाईन वीजदेयक भरतात त्यांच्यासाठी वीज बीलावर 0.5 टक्के सूट प्रस्तावित केली आहे. महाराष्ट्रात नवीन उद्योग यावेत तसेच विद्यमान उच्चदाब ग्राहकांनी आपला वीज वापर वाढवावा यासाठी महावितरणने विशेष प्रोत्साहनपर सवलती आपल्या मध्यावधी आढावा याचिकेत प्रस्तावित केल्या आहेत. या प्रस्तावामध्ये राज्यात नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नवीन उपवर्गवारी प्रस्तावित करुन विद्यमान ग्राहकांना (औद्योगिक, वाणिज्यिक आणि रेल्वे) वाढीव वीजवापरावर तसेच नवीन येणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक आणि रेल्वे ग्राहकांच्या वीजदरात 1 रुपये प्रतीयुनिट सवलत प्रस्तावित केली आहे. तसेच मोठया प्रमाणावर वीजवापर करणाऱ्या ग्राहकांना वीज आकारात 1% पासून 10% पर्यंत सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Mumbai Police Viral Video: '50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू;
'50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू; "त्या पोलीस काकांना निलंबित करू नका", व्हायरल व्हिडीओतील तरुणाने सांगितली गाडीतील इनसाईड स्टोरी
Chandrakant Patil on Neet Exam: 'आंबा चोरला म्हणून फाशीची शिक्षा द्यायची नसते'; पेपरफुटीवरून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले...
'आंबा चोरला म्हणून फाशीची शिक्षा द्यायची नसते'; पेपरफुटीवरून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Embed widget