APMC Election : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची (Nanded Agricultural Produce Market Committee ) एकहाती सत्ता आली आहे. 18 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने भाजप (Bjp) आणि शिंदे गटाचा सुफडा साफ केला आहे. या निवडणुकीत  काँग्रेसला 12, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, ठाकरे गटाला 2 जागा तर एक जागा अपक्षाला मिळाली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी गड राखला आहे. 


नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला पराभवाचा धक्का बसला आहे.


नांदेडमध्ये पाच बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेसला यश


नांदेडमध्ये झालेल्या पाच बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेसला यश मिळालं आहे. सर्वच ठिकाणी काँगेस आणि आघाडीने बाजी मारल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये आम्हाला लोकांची काँग्रेसला साथ आहे. लोकांचं प्रेम आहे, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यात काँगेस आणि महाविकास आघाडीला यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यात मधल्या काळात जी राजकीय उलधापालथ झाली, ती अनैसर्गिक होती. कायद्याला धरुन नव्हती असंही चव्हाण म्हणाले. मात्र, लोकांना ते आवडलं नाही. त्यामुळं बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 


राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरु आहे. काही ठिकाणी या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. तर काही ठिकाणी अद्याप मतदान सुरु आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या पॅनेलचा पराभव झाल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडे, विजयकुमार गावीत, मंत्री दादा भुसे यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. काल काही बाजार समित्यांचा निकाल लागला आहे. आज राहिलेल्या बाजार समित्यांचा निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यातील बाजार समित्यांवर नेमकं कोणाचं वर्चस्व आहे हे स्पष्ट होमार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: 


Raju Shetti : राजू शेट्टींनी घेतली अशोक चव्हाणांची भेट, शेट्टी म्हणाले राजकीय विषयावर चर्चा, तर चव्हाण म्हणाले...