Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची नांदेडमध्ये भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड वीस मिनिटं चर्चा झाली. भेटीत राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा झाल्याचे मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं. तर आगामी काळात एकत्र येऊन महाराष्ट्रात काम केलं पाहिजे अशी भुमिका मी त्यांना सांगिल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.


Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्यासोबत 20 वर्षापासून संबंध


राजू शेट्टी आणि अशोक चव्हाण यांच्यात आज वीस मिनिट बंद दाराआड चर्चा झाली. आज राजू शेट्टी नांदेडला आले होते. सकाळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिट बैठक चालली. अशोक चव्हाण यांच्यासोबत 20 वर्षापासून संबंध असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आज नांदेडला आलो त्यामुळं अशोक चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीत राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले.


राजू शेट्टी आमचे मित्र, आमच्या सरकारच्या काळात त्यांचं सहकार्य 


दरम्यान, राजू शेट्टी आपले मित्र असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. आमच्या सरकारच्या काळात त्यांचे सहकार्य लाभल्याचे चव्हाण म्हणाले. आमची वैचारिक भुमिका एकच आहे. ते आम्हाला आम्ही त्यांना सहकार्य करतो असे अशोक चव्हाण म्हणाले. मित्र नांदेडला आल्यानं त्याचं स्वागत केल्याचं चव्हाण म्हणाले. आगामी काळात एकत्र येऊन महाराष्ट्रात काम केलं पाहिजे अशी भुमिका मी त्यांना सांगिल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले.  


नांदेडमध्ये पाच बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेसला यश


नांदेडमध्ये झालेल्या पाच बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेसला यश मिळालं आहे. सर्वच ठिकाणी काँगेस आणि आघाडीने बाजी मारल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये आम्हाला लोकांची काँग्रेसला साथ आहे. लोकांचं प्रेम आहे, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यात काँगेस आणि महाविकास आघाडीला यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यात मधल्या काळात जी राजकीय उलधापालथ झाली, ती अनैसर्गिक होती. कायद्याला धरुन नव्हती असंही चव्हाण म्हणाले. मात्र, लोकांना ते आवडलं नाही. त्यामुळं बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Krishna River Pollution : कृष्णा नदी बचावासाठी सांगलीत मानवी साखळी आंदोलन; राजू शेट्टी आंदोलनात सहभागी