Sanjay Raut : उद्या (1 मे) मुंबईमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. ही सभा ऐतिहासीक होणार असल्याचा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. त्या सभेची तयारी, आमचा जोष पाहायला देशाचे गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) आज मुंबईत येणार आहेत. आमची नागपूरला सभा होती त्यावेळी पण गृहमंत्री खारघरला आले होते असे राऊत म्हणाले.
उद्या महाविकास आघाडीची तिसरी सभा होत आहे. पहिला सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दुसरी सभा नागपूरमध्ये झाली. तर तिसरी सभा उद्या राज्याच्या राजधानीत होत आहे. या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील जनमानसाचा निकाल कोणाच्या बाजून हे उद्या समजेल असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास घाडीचे सर्वच नेते उद्या उपस्थित राहतील असे राऊत म्हणाले.
लोकांची मन की बात स्पष्ट झाली
यावेळी शिवसेना महाविकास आघाडीसह कृषी उत्पन्न बाजार समितीसह निवडणुकीत उतरली होती. आपण आकडे पाहायले असतील तर महाविकास आघाडीली या निवडणुकीत यश मिळालं आहे. शेतकरी भाजपला वैतागले आहेत. त्यांनी या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लाथ मारली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत लोकांची मन की बात स्पष्ट झाल्याचे राऊत म्हणाले.
महानगर पालिकांच्या निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे. पण त्यांना बाजार समित्यांमध्ये जसे निकाल लागले तसेच निकाल लागतील अशी भीती असल्याचे राऊत म्हणाले.
बारसूमधील लोकांवर आणखी अत्याचार सुरुच
बारसूमधील लोकांवर आणखी अत्याचार सुरुच आहेत. तिथे पोलिस कारवाया सुरु आहेत. उद्धव ठाकरेंना सुद्धा पाय ठेवू दिला जाणार नाही अशी धमकी दिली जात आहे. पण आम्ही या धमकीला भीक घालत नाही. हिंमत असेल तर आडवा असेही राऊत म्हणाले. कोकण हे कोणाच्या मालकीचे नाही शिवसेनेचे उर्जास्थान आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे कोकणात जातील चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे राऊत म्हणाले. महाडमध्ये 6 मे दिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे. त्यामुळं कोकणात शिवसेनेचे पाय घट्ट आहेत. यापुढेही आणखी घट्ट होतील असे राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: