मुंबई: महाविकास आघाडीची (MahaVikas Aghadi) 288 जागांवर पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण झालीय. तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यात चर्चा होईल. तिढा असलेल्या जागांबाबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अंंतिम निर्णय घेतला जाईल. त्यासाठी तीनही पक्षांकडून एकत्र सर्व्हे केला जाईल. 30 ते 35 जागांमध्ये दोन ते तीन पक्ष आग्रही असल्याने यातल्या जागा दुसऱ्या टप्प्यात चर्चेसाठी घेतल्या जातील. काही जागांमध्ये अदलाबदल केला जाणार आहेत. महाविकास आघाडी लवकरच नेत्यांचे दौरे आणि संयुक्त मेळाव्याबद्दल कार्यक्रम जाहीर करणार आहे.
महाविकास आघाडी लवकरच संयुक्त मेळावे आणि नेत्यांच्या दौऱ्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे. 2019 ला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. काही जागांमध्ये अदलाबदल केला जाणार आहे. साधारणपणे 30 ते 35 जागांमध्ये दोन किंवा तीन पक्ष आग्रही असल्याने यातील जागा दुसऱ्या टप्प्यात चर्चेसाठी घेणार आहे. महाविकास आघाडी लवकरच नेत्यांचे दौरे आणि संयुक्त मेळाव्याबद्दल कार्यक्रम जाहीर करणार आहे.
भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपणार आहे. सध्या महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाचे सरकार आहे. त्याचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांवर निवडणुका झाल्या. 106 आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होऊ शकली नाही. शिवसेनेने 56 आमदारांसह काँग्रेससह 44 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसने 53 आमदारांसह महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मे 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंडखोरी केली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना दोन गटात विभागली गेली. एक गट शिंदे गटाचा तर दुसरा उद्धव गटाचा होता. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव 'शिवसेना' आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदे गटाकडेच राहण्याचे आदेश दिले.
हे ही वाचा :
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा