एक्स्प्लोर

महाराष्ट्राचे सहा खासदार संसदरत्न, धनंजय महाडिकांची हॅटट्रिक

संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रत्येक वेळी उपस्थित राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या, संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षीदेखील संसदेत विशेष कामगिरी बजावणाऱ्या खासदारांना गौरवण्यात आले.

चेन्नई : संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रत्येक वेळी उपस्थित राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या, संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षीदेखील संसदेत विशेष कामगिरी बजावणाऱ्या खासदारांना गौरवण्यात आले. पुरस्कारांचे वितरण आज चेन्नईच्या राजभवनात पार पडले. यावेळी महाराष्ट्राच्या सहा खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज चेन्नईमधल्या राजभवनमध्ये संसदरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, राजीव सातव, श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, हीना गावित या लोकसभा खासदारांना आणि राज्यसभा खासदार असलेल्या रजनी पाटील यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. धनंजय महाडिकांना सलग तिसऱ्या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडूचे राज्यपाल भंवरलाल पुरोहीत पुरस्कार वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. पुरोहीत म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात देश आणि समाजहिताचे काम चालावे ही जनतेची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात. त्यासाठी खासदारांनी संसदेत सक्रिय असणे आवश्यक असते. संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणे असा आहे. संसदरत्न पुरस्करासाठीचे निकष संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पी. आर. एस. इंडिया, प्रोसेन्स प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समिती या तीनही संस्था संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करते. संसदेत केली जाणारी विविध मुद्द्यांची मांडणी, प्रश्न विचारणे, सभागृहातील चर्चांमधील सहभाग, खासगी विधयेक सादर करणे यांसह काही अधिक निकषांद्वारे संसदरत्न पुरस्कारासाठी खासदारांची नावे निश्चित केली जातात. धनंजय महाडिकांची हॅटट्रिक कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना लागोपाठ तीन वर्षे संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संसदरत्न पुरस्कार मिळवण्याची हॅटट्रिक केल्यामुळे महाडिकांचे विशेष कौतुक करण्यात आले. महडिकांनी हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करत असल्याचे सांगितले. नंदूरबारच्या हीना गावितांना चौथ्यांदा संसदरत्न नंदूरबारच्या खासदार हीना गावित यांना यंदा चौथ्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील त्या एकमेव खासदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget