Beed: पारधी समाजातील महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून त्या कुत्र्याने महिलेच्या मांडीचा लचका तोडल्याने महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात कुत्र्याच्या मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकानं इशारा करताच कुत्र्यानं संबंधित महिलेचा मासांचा लचका तोडलाय. ही घटना केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे घडलीय.                

  


मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील जनाबाई शिंदे ही पारधी समाजातील महिला 22 मार्च मंगळवार रोजी चार वाजताच्या दरम्यान रस्त्याने खळे मागण्यांसाठी रस्त्याने जात होती. त्यावेळी गावातील एकानं तिच्या दिशेने एकाने त्यांच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडला होता. तसेच त्याला चावा घेण्याचा इशारा केला. त्यानंतर त्या कुत्र्याने जनाबाई शिंदे हिच्या डाव्या मांडीच्या मांसाचा लचका तोडला आहे. त्यामुळे ती महिला जखमी झाली. दरम्यान, कुत्र्याच्या मालकाने जखमी झालेल्या महिला जनाबाई शिंदे यांच्या घरी जाऊन तिला जातीवरून व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.


जनाबाई शिंदे आणि कुत्र्याचे मालक अविनाश गाताडे व रवी गाताडे यांच्या पूर्वी कुठल्याही स्वरूपाचे भांडण नव्हते. मात्र, ती चोरी करण्यासाठी जात असावी असा त्यांचा गैरसमज झाला असावा असे त्या महिलेचे म्हणणे आहे. या प्रकरणी जनाबाई शिंदे हिच्या तक्रारी वरून कुत्र्याचा मालक अविनाश गाताडे व त्याचा भाऊ रवि गाताडे यांच्या विरुद्ध 29 मार्च 2022 रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 96/2022 भा. दं. वि. 289, 504, 506 व  34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील चौकशी आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha