नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर  होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  लवकरच केंद्र सरकारकडून हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाणार आहे.


देशातील कोरोनाचे संकटात मोठ्या प्रमाणात घट झाली तरी कोरोना नियमांचे पालन करत अधिवेशानाचे आयोजन करण्यात आले आहे.  सत्रादरम्यान 20 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशन घेतले नव्हते आणि  या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेलं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं होतं. पेगॅसस आणि  नव्या कृषी कायद्यावरुन  लोकसभेत आणि राज्यसभेत चांगलाच गदारोळ माजला होता.सभागृहात खासदारांऐवजी मार्शल्सची संख्या जास्त दिसत होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या गोंधळावरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते.  त्यामुळे सरकारनं ते दोन दिवस आधीच गुंडाळलं होते.


Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकांचे खासगीकरण आणि पेन्शनसंबंधी विधेयक सादर होण्याची शक्यता


महगाई, इंधन  दरवाढ, खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमती, काश्मिरमध्ये सामान्य नागरिकांवर होणारे दहशतवादी हल्ले, लखीमपूर हिंसा, कृषी कायद्याविरुद्ध विरोधक प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारला विविध प्रश्नावरुन घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखण्यात येत आहे.  पुढच्या वर्षीच्या सुरुवातील पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन चांगलंच रंगण्याची चिन्ह आहेत.