Maharashtra Winter Assembly Session LIVE Updates : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह
Maharashtra Winter Assembly Session : आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस. पेपरफुटी, नोकरभरतीवरुन सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती, तर विरोधकांचे आरोप परतवण्यासाठी सरकारची तयारी.
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पहिला ओमायक्रॉन बाधित रग्ण आढळला आहे. कतार येथून तो भिवंडी शहरातील गैबिनगर परिसरात आला होता. त्याची आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकानांची तोडफोड, भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. पोलीस दलातील भ्रष्टाचारासंबंधी माहिती देऊनही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असाही आरोप त्यांनी केला.
अमरावती दंगलीवेळी सोशल मीडियाद्वारे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कोणतंही नियोजन नसताना 40 हजार लोक एकत्र कसे आले असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
विधानसभेच कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ
आज दुपारी साडेतीनवाजता मंत्रीमंडळ बैठक होत आहे. मुख्यमंत्री समिती कक्ष विधान भवनात बैठक
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांचे जनसंपर्क अधिकारी केतन पाठक कोरोना पाॅझिटीव्ह
काल कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह रिपोर्ट आल्याची माहिती
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी
विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग, भाजपने आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावला, भाजप आमदारांना 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश
विधानभवनातील सॅनिटायझर मशीन केवळ शो पीस, लिक्विडच नाही, सुधीर मुनगंटीवारांचा आरोप,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सभागृहात सदस्यांनी मास्क लावत नसल्याची नाराजी बोलून दाखवली
त्यांनतर सगळ्या सदस्यांनी मास्क लावण्यास सुरुवात केली..
पण, विधान भवनातील सॅनिटायझरच्या मशीनमध्ये लिक्विडच नाही, अस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले
दादा, तुम्ही केवळ सूचना देता, मग मशीनमध्ये लिक्विड नाही याची जबाबदारी कोणाची ? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला
हे मशीन आता इतके जुने झालेत की त्यावर आता संशोधन करण्याची गरज आहे..
युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांचा विधानभवनासमोर रॉकेल घेत ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
नाशिक शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या नवीन नियमावलींना कंटाळून विधान भवनसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न
स्वतःला सक्षम बोलणारे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय सत्ताधारी पक्षाच्या दबावात काम करत असल्याचा आरोप
युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांचा हिवाळी अधिवेशन चालू असताना विधान भवन आत्मदहनाचा प्रयत्न
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पुतणे सराईत गुन्हेगार अजय बागुल हे सत्ताधारी पक्षात असल्यामुळे नाशिक शहराच्या पोलिस आयुक्तांकडून वारंवार करण्यात आलेल्या बचावामुळे युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी विधान भवन समोर रॉकेल आतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात विरोधकांची घोषणाबाजी, ओबीसी मुद्दा, पेपर फुटी विषयावर घोषणाबाजी सुरू
विधानसभा अध्यक्ष निवडणुक लढवावी का यासंदर्भात भाजपाच्या कोअर नेत्यांची थोड्या वेळात बैठक होणार
देवेंद्र फडवणीस , चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यात होणार बैठक
विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीतील नेते आग्रही
शक्ती विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळाली आहे. विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत ठेवलं जाणार आहे. दोन्ही सभागृहातच्या मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
सायंकाळ पाच वाजता सर्व प्रमुख नेत्यांची बैठक, विधीमंडळात सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांची होणार बैठक
अजित पवार, अनिल परब, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडवणीस, प्रवीण दरेकर यासह प्रमुख नेते या बैठकीला असतील
अधिवेशन कामकाज, कालावधी यावर आजच्या बैठकीत चर्चा, तसंच विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम यावर ही चर्चा होण्याची शक्यता
बीड जिल्ह्यात साडेपाच हजार शिधापत्रिका गहाळ झाल्याची सरकारची कबुली
बीड जिल्ह्यातील बीड तहसील कार्यालयातून सुमारे साडेपाच हजार शिधापत्रिका गहाळ झाल्या असल्याची कबुली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली
बीड जिल्ह्यातील बीड तहसील कार्यालयातून सुमारे पाच हजार 498 शिधापत्रिका गहाळ झाल्या असून त्यांचे बोगस वितरण झाल्याचा प्रश्न आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात उपस्थित केला
याला उत्तर देताना आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही बाब खरी असल्याचे मान्य केले
यासंदर्भात बीड येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार आणि अव्वल कारकून यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. विभागीय चौकशी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी सादर केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे
तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी बीड हे पद भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही भुजबळ यांनी सभागृहात दिली.
ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक, विधानसभेच्या बाहेर गोंधळ, प्रकाश आंबेडकर यांच्यासह आंदोलकांना आझाद मैदानात आणलं..
मुंबईतील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली
मागील १० वर्षात जवळपास निम्म्याहून कमी घटली
सन २०१०-२०११ मध्ये ४१३ शाळांमध्ये १लाख २ हजार २१४ होती
मात्र २०२०- २०२१ मध्ये ही संख्या २८० शाळा आणि ३६ हजार ११४ एवढी आहे
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत लेखी उत्तर
मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून आणखी सात हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. बोईसर इथली सदिच्छा साने ही एमबीबीएसची विद्यार्थिनी परीक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे इथून दिवसाढवळ्या बेपत्ता झाल्याच्या घटनेकडे त्याचप्रमाणे गेल्या सहा महिन्यात मुंबईतून 534 मुलींच्या अपहरणाची नोंद झाल्यासंदर्भातील प्रश्न शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना सतेज पाटील बोलत होते. बेपत्ता झालेल्या मुली सापडण्याचं प्रमाण ९५ ते ९७ टक्के आहे. बेपत्ता मुलींना शोधण्यासाठी मुस्कान अभियान यांसारख्या विविध उपाययोजना सरकार राबवत आहे. या प्रश्नाबाबत समाजमाध्यमं ही अनेक पुढाकार घेत आहेत,त्यांच्याशी सायबर विभाग संवाद वाढवून ही मोहीम विस्तारण्यासाठी मदत करेल असं सतेज पाटील यांनी सांगितलं. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे , मात्र उपसभापती नीलम गोर्हे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं.शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, यादृष्टीनं,इयत्ता ४ मार्च पासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ३ मार्च पर्यंत तर १५ मार्च पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज १४ मार्च पर्यंत भरण्याची मुभा देण्यात येत असल्याचं गायकवाड यांनी घोषित केलं.
विधानसभेत अनिल परब आणि नितेश राणे आमनेसामने, अनिल परब परिवहन विभागाच्या प्रश्नावर बोलत असताना नितेश राणे बोलायला लागले, त्यानंतर नितेश राणे यांना आसनावर बसवा त्यानंतर माझ्याशी तुम्ही परवानगी दिल्यानंतर बोलतील
राज्यातील शक्ती विधेयक पुन्हा एकदा संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबत भाजपची भूमिका, विरोधी पक्ष नेत्यांनी मांडली सूचना, विधानसभा आणि विधान परिषद आमदार मिळून 321 सदस्यांच्या समितीत कायद्यावर चर्चा व्हावी ही मागणी, कालच शक्ती कायद्यातील संयुक्त समितीने दिलेल्या सुधारणा राज्य सरकारने विधान सभेत मांडल्या
विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने घेण्याच्या विधानसभा नियमात बदल करताना सदर बदलावर आपल्या हरकती, सुचना देण्याचा विधानसभा सदस्यांचा अधिकार दहा दिवसांवरुन एक दिवस करण्याचा बहुमताच्या जोरावर ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला निर्णय असंविधानिक आहे. यातून पुन्हा एकदा ठाकरे सरकारचा अहंकारच दिसून आल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पध्दतीने घेण्याच्या विधानसभा नियमात सुधारणा करण्याचे नियम समितीने प्रस्तावीत केलेला प्रस्ताव आज विधानसभेत ज्यावेळी सत्ताधारी पक्षांनी मांडला. त्यानंतर त्या बदलाबाबत दहा दिवसांत हरकती सुचना देण्याचा नियम 225(1) व 225(3) या नियमात नियम 57 नुसार बदल करुन 10 दिवसाची मुदत 1 दिवस करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बदलाला सभागृहात कडाडून विरोध केलाच याच विषयावर प्रसिद्ध पत्रक काढून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत जो नियम बदलण्यात आला आहे. त्याचवेळी याबाबत हरकती सुचना मांडण्याच्या कालावधीचा नियम ही बदलण्यात आला. त्रास तशी शिफारस नियम समितीने केलेली नाही. त्यामुळे नियम 57 चा आधार घेऊन परस्पर सत्ताधारी पक्षाला वाटतो म्हणून विधानसभेतील नियम बदलण्यात आला. त्याची कारणही सांगितलेले नाही. या विषयात सरकारी पक्षाने नियम 57 चा आधार घेऊन नियम बदलला असून नियम 225(1) व नियम 225(3) या नियमानुसार विधानसभा सदस्यांना आपल्या हरकती सुचना देण्यासाठी असलेला 10 दिवसांचा कालावधी गोठवून 1 दिवस करण्यात आला. मग तो कालावधी 3 दिवस किंवा 5 दिवस का नाही? किंवा 1 दिवसच का? असे प्रश्न उपस्थितीत होतात.
ज्या नियम 57 चा आधार घेऊन हा बदल करण्यात आला तो नियम 57 हा केवळ नियम स्थगित करण्याचा अधिकार देतो या नियमानुसार कुठलाही नियम बदलण्याची तरतूद या नियमात नाही. त्यामुळे जर बदल करायचा होता तर या याबाबत नियम समितीकडे सरकार का गेले नाही? विधानसभा सदस्यांना अभ्यास करुन आपलं मत मांडता यावे म्हणून हा कालवाधी 10 दिवसांचा देण्यात आला आहे. तो गोठवून सदस्यांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाहीला बळकट करणाऱ्या सभागृहात लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा गळा घोटला गेला.
विधानसभा सदस्यांना घटनात्मक असलेल्या अधिकाराची पायमल्ली करणारा हा बदल असून सत्ताधारी पक्षांने मनमानी करुन अहंकारातुन असंविधानिक पध्दतीने हा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे ठाकरे सरकारची वारंवार असंविधानिक निर्णय घेण्याची परंपरा कायम असून अराजकतेकडे राज्य घेऊन जाण्याचे काम ठाकरे सरकार करीत असल्याची टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड सरकारला करायची आहे की नाही असा सवाल महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत उपस्थित केला.
महाविकास आघाडीचे सरकार हे चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मतदानाचा ते आग्रह ते करीत असल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सभागृहात आमदार घोडेबाजार करतात असा उल्लेख केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांसोबत बसूनही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल तोडगा काढू शकतात. परंतु ते तसे करण्यापासून मुद्दाम स्वत:ला रोखत आहेत असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारजवळ धैर्य नाही. आवाजी पद्धतीने मतदान घेण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्यात यावे असे ते म्हणाले. आवाजी पद्धतीने प्रभारी अध्यक्षांनी परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
माहिती जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची अचानक बदली, अचनाक बदली झाल्याचे दिले आदेश, दीपक कपूर यांच्याकडे अतिरिक्त पदभार माहिती जनसंपर्क महासंचालक, पांढरपट्टे यांची अचानक बदली करण्यात आली, त्यांना मृदा जलसंधारण, रोजगार हमी योजना सचिव पदावर नियुक्ती
विधानसभा उपाअध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याकरता प्रत्येक निलंबित आमदाराकडून असे स्वतंत्र विनंती पत्र देण्यात आले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस, लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत पंतप्रधानांकडून आवर्जून चौकशी
लोकसभेत शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याकडे पंतप्रधानांनी केली विचारणा
आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अशातच आज राजकीय आखाडा रंगताना पाहायला मिळणार आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स पाहा एबीपी माझा लाईव्हवर...
अभाविपची विधानभवनाकडे कूच, विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केलेत म्हणून मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातून आंदोलनाला सुरुवात
शक्ती विधेयकाकरता चिकीत्सा समितीचा मसुदा अंतीम करण्यात आला आहे. आरोपींना लवकर शिक्षा होऊन, महिलंचं मदत पुर्नवसन लवकर व्हावं याकरता हे विधेयक महत्वाचं आहे. या विधेयकावर अधिवेशनात चर्चा होऊन लवकर मंजूर होईल अशी अपेक्षा असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
आज विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, अधिवेशनासंबंधित सर्व अपडेट्स पाहण्यासाठी पाहा 'एबीपी माझा युट्यूब लाईव्ह'
पेपरफुटी प्रकरणात मंत्री मंडळातील मंत्र्यांचा समावेश, आमदार प्रसाद लाड यांचा आरोप
- आम्ही यासंदर्भातील पुरावे पटलावर ठेऊ
- यामध्ये गृहनिर्माण मंत्री, शिक्षण मंत्री, यांची चौकशी झाली पाहीजे.
- पेपरफुटी प्रकरणात आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
- जर यांनी सीबीआय चौकशी मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन मागणी करू.
- सरकार पोलिस चौकशी करतयं मात्र त्यांच्यावर मंत्र्यांचा दबाव आहे.
हिवाळी अधिवेशन सुरु होतंय. त्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरुन राजकारण रंगायला सुरुवात झालीय. त्यात मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून ते कधीही सभागृहात हजेरी लावतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. याशिवाय मुख्यमंत्र्यांना अधिभार कुणालाही देण्याची आवश्यकता नाही असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनाही दिलं आहे.
Maharashtra Winter Assembly Session LIVE : विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून भाजपाची घोषणाबाजी, पेपरफुटी, शेतकऱ्यांचे वीज बिल, आरोग्य विभाग भरती, म्हाडा भरती यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी
- अधिवेशनासंबंधी प्रत्येक घडामोडींसाठी क्लिक करा...
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-winter-assembly-session-live-updates-winter-session-of-legislature-begins-today-at-mumbai-1020070
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीमुळे कमालीचा गारवा आला असला तरी आजपासून मुंबईत वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण आजपासून मुंबईत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होतंय. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतंय. पेपरफुटी प्रकरण, ओबीसी राजकीय आरक्षण, एसटी संपासह विविध मुद्द्यांवरुन हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार यात शंका नाही. याशिवाय वीजबिल, लॉकडाऊन, महिला सुरक्षा आणि अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचं नुकसान या मुद्द्यांवरुन रणकंदन होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाला मुख्यमंत्री गैरहजर होते. त्यामुळे मुख्यमंत्री प्रत्यक्ष अधिवेशनासाठी उपस्थित राहणार का याकडं लक्ष लागलंय.
Maharashtra Winter Assembly Session : आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच शाब्दिक 'वॉर' रंगल्याचं चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे मनात आणलं तर रश्मी ठाकरे यांनाही मुख्यमंत्री करू शकतात. 45 दिवस झाले मुख्यमंत्री नाहीत. या पदाचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाकडे तरी द्यायला हवा. रश्मी ठाकरे यांना आधी शपथ द्यावी लागेल, परंतु ठाकरे काही करू शकतील त्यांचाही असाच शपथ विधी झाला होता, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांनी मनात आलं तर रश्मी ठाकरे काय ते तेजस ठाकरे यांनाही मुख्यमंत्री करू शकतील, असंही ते म्हणाले.
Winter Assembly Session Maharashtra : महाराष्ट्रात आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अधिवेशनाआधी करण्यात आलेल्या RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सत्र सुरू होण्यापूर्वी सुमारे 3500 लोकांची चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेणे बाकी आहे. मंगळवारी, महाराष्ट्रात कोरोनाचे 825 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ओमायक्रॉनच्या 11 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या RTPCR चाचणीत आठ पोलिसांसह 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांपैकी दोघे विधिमंडळाचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेणे बाकी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निषेध ठराव मांडणार,महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय,
ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी छगन भुजबळ ठराव मांडणार
सभागृहात महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याच्या संदर्भात सुचना
महाविकास आघाडीने दोन वर्ष जे महत्वाचे निर्णय घेतले आहेत ते वारंवार सभागृहात मांडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत
सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आज भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी निलंबन मागे घ्यावं याकरिता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे स्वतंत्र अर्ज केला आहे
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टाने निलंबन मागे घ्यावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करा असं सांगितलं होतं
त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात बद्दलच विनंती पत्र आज प्रत्येक आमदारांना स्वतंत्रपणे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलं आहे
केंद्राने लवकरात लवकर हस्तक्षेप याचिका दाखल करावी आणि देशाचं ओबीसी आरक्षण वाचवावं असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की, इम्पिरीकल डेटा द्यायला नकार दिला आणि शेवटी सांगितलं की, डेटा नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आले. त्यावेळी आम्ही बोललो होतो संपुर्ण देश आरक्षणाला मुकणार आहे आणि तसंच झालं, छगन भुजबळ म्हणाले.
अधिवेशन दरम्यान एकूण 3500 जणांच्या कोरोना चाचण्या, 10 जणांचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पुर्व संध्येला सरकारकडून आमंत्रित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत सरकरावरती कडाडून टीका केली आहे. तिच विरोधकांची आक्रमकता सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पाहायला मिळणार आहे. एसटी कर्मचारी संप, नोकर भरती घोटाळा, ओबीसी राजकीय आरक्षण यासह अनेक मुद्यांवर विरोध आक्रमक होणार आहे. तसेच ग्राहकांची होणारी विज कपात आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. या लक्षवेधी वरती विरोधक आक्रमक होणार आहे. त्यामुळं आजचा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचसोबत शक्ती कायदा आणि अध्यक्ष निवडणुकीच्या नियम बदलण्याच्या संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल ही सभागृहाच्या पटलावर ठेवला जाणार आहे.
सध्या राज्यावर ओमायक्रॅानचे संकंट घोंगावत आहे, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस आग्रही असणार आहे. नुकत्याच विधानपरिषदेत काही ठिकाणी झालेला महाविकास आघाडीचा पराभव सरकारला चिंतेत टाकणार आहे. याआधी अनिल देशमुख आणि संजय राठोडसारख्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत, आगामी काळात कोणाचा नंबर लागणार? याचीही चर्चा सुरु आहे.
सध्या राज्यात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीणीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर काही तोडगा निघालेला नाही. या मुद्यांवरुन विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या जोरदार चर्चेत आहे. या अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वच पक्ष एकमेकांना भिडणार आहेत. या मुद्द्यावरून राजकीय राडा बघायला मिळू शकतो. तसेच आरोग्य विभाग असो किंवा म्हाडाची परिक्षा किंवा एमपीएससीची परीक्षा या परीक्षांमध्ये सातत्याने घोळ झालेला पाहायला मिळतो. हा मुद्दाही अधिवेशनात गाजणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडीवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सामना रंगणार आहे.
Maharashtra Winter Assembly Session : आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पार्श्वभूमी
Winter Assembly Session Maharashtra : हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आणि आज ठाकरे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती तयार आहे. नोकरभरती, वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षेत झालेले घोळ यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती असणार आहे. काल भाजप आमदारांची आयोजित केलेल्या भोजनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय. दरम्यान परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे गेल्या सरकारशी जोडले गेले आहेत हे पुराव्यानिशी सादर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळं आज परीक्षा घोटाळ्यांवरुन सरकारची परीक्षा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती काल डिनर टेबलवर शिजली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर काल रात्री भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमात सरकारला कसं घेरायचं याबाबत फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केलं. नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्यावरून सरकारला घेरण्याची तयारी भाजपनं केली आहे.
हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्या दिवशीही विरोधक आक्रमक राहण्याची दाट शक्यता आहे. विशेषता नोकर भरती मध्ये झालेला घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक राहतील. मात्र त्याच वेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा आक्रमक होतील आणि याची कुठेतरी धागेदोरे मागील सरकारच्या काळांमध्ये आहे, त्याचे पुरावे देण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे विज बिल संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी राखून ठेवायला सांगितलं त्यात नाना पटोले यांनी या सुरात सूर मिसळून ही राखून ठेवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा विज बिल संदर्भांमध्ये विरोधक आक्रमक होतील आणि त्याच वेळी अजित पवार यांनी उत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर यांच्याबद्दल अशिष शेलार यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य यावर ही शिवसेना आमदार आक्रमक होईल.
विधानसभेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेले वक्तव्य यावरून कारवाई मागणी करणारी लक्षवेधी सूचना सेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी टाकली आहे. तर भाजप आमदार अमित साटम यांनी कोविड काळात मिरा-भाईंदर, भंडारा येथे रूग्णालयाला आग लागून मृत्यू झाल्याच्या घडल्या याची लक्षवेधी विशेष आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे. लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या काय घेतल्या जातात याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयकं सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे. तसेच काल भास्कर जाधव यांनी केलेली मोदींची नक्कल आणि त्यानंतर भाजपची आक्रमकता यांमुळे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विशेष गाजला. अशातच आज पुन्हा विरोधक-सत्ताधारी एकमेकांसमोर येणार आहे. त्यामुळे आज सभागृहात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -