Aanandacha Shidha : आनंदाचा शिधा लवकरच सर्वांपर्यंत पोहोचेल असा पुर्नउच्चार बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. त्यानंतर आनंदाचा शिधा रेशन दुकानांपर्यंत पोहोचवण्याची लगबग सुरु झाली. दिवाळीला काही तास असताना का होईन आनंदाचा शिधा पदरात पडल्याने महिला वर्ग खूश झाला आहे. पण हा असा आनंद पुणेकरांना घेता येत नाहीये कारण आनंदाचा शिधा वाटप रखडलेलं आहे. पण चंद्रपुरात शिधा वाटपाला मुहूर्त मिळालाय. चंद्रपूर, कोल्हापूर, नंदुरबार आणि सातारा येथे काही ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचला आहे. पण काहींच्या पदरात शिधा पडलाय. तर काही अजूनही शिधेच्या प्रतिक्षेत आहेत. पिशव्यांमुळे ताटकळलेला शिधा किमान दिवाळी आधी मिळावा एवढीच सर्वसामान्यांना अपेक्षा आहेत. एका किटमध्ये एक किलोप्रमाणे डाळ, साखर, रवा आणि एक लिटर तेल पिशवी दिली जाणार आहे. नियमित धान्यासोबत सोबतच या आनंदाच्या शिधाचे वितरण केले जाणार आहे.
डाळ, साखर, रवा आणि एक लिटर तेल पिशवी या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार आहेत. सरकारच्या घोषणेनंतर या वस्तू वेळेत वितरित झाल्या नसल्याचं वास्तव माझाने समोर आणलं. त्यानंतर अन्न व नागरीपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २० तारखेपर्यंत या वस्तू पोहोचतील असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही सगळ्या रेशन दुकानावर किट पोहोचलेल्या नाहीत.
राज्यात किती प्रमाणात आनंदाचा शिधा पोहोचलाय, पाहूया.
नागपूर शहर-
३ लाख ८५ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर २ लाख ९५ हजार
तेल ३ लाख ८५ हजार
रवा ८० हजार
चणाडाळ ५० हजार
नागपूर ग्रामीण
४ लाख ११ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर १००%
तेल १००%
रवा ५०%
चनाडाळ ५०%
अमरावती
५ लाख ५७ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर ७० हजार
तेल ७० हजार
रवा ७० हजार
चणाडाळ ७० हजार
चंद्रपूर
४ लाख ९ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर २ लाख ४ हजार
तेल ३ लाख १४ हजार
रवा १ लाख ८४ हजार
चणाडाळ १ लाख ९० हजार
यवतमाळ
५ लाख ७७ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर १ लाख ९० हजार
तेल प्राप्त नाही
रवा ५० हजार
चणाडाळ ६० हजार
वर्धा
२ लाख ८५ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर २ लाख १० हजार
तेल २ लाख ४६ हजार
रवा ३८ हजार
चणाडाळ ७० हजार
बुलढाणा
४ लाख ८८ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर ८१ हजार
तेल २० हजार
रवा ५० हजार
चणाडाळ अद्याप प्राप्त नाही
वाशिम
२ लाख ५२ हजार लाभार्थी (अपेक्षित)
साखर ३० हजार
तेल २२ हजार
रवा अद्याप प्राप्त नाही
चणाडाळ ३० हजार
नंदुरबार
२ लाख ६३ हजार ८२१ लाभार्थी (अपेक्षित)
रवा ९० हजार ४९०
साखर ६ हजार ६९०
चणाडाळ ८ हजार १०
पामतेल १ लाख १६ हजार ६४०
भंडारा
२ लाख ३० हजार २८९ लाभार्थी
रवा ३२ हजार ५५६
साखर ७५ हजार २०
चणाडाळ १८ हजार २१७
तेल १ लाख ५४ हजार ४४९
नाशिक
८ लाख लाभार्थी
रवा २%
साखर २०%
चणाडाळ ९%
पामतेल ४०%
धुळे
२ लाख ९९ हजार लाभार्थी (अपेक्षित)
रवा ५%
साखर ७%
चणाडाळ ६%
पामतेल- ५%
जळगाव
६ लाख २० हजार ६५०लाभार्थी (अपेक्षित)
रवा ३ लाख २६ हजार ९८
साखर ८८ हजार ४८०
चणाडाळ १ लाख ९३ हजार ६९०
पामतेल ४ लाख ४३ हजार ९२२
रत्नागिरी
२लाख ७५ हजार लाभार्थी (अपेक्षित)
रवा प्राप्त नाही
साखर ५०%
चणाडाळ प्राप्त नाही
पामतेल ८०%
सिंधुदुर्ग
१ लाख ६३ हजार १२ लाभार्थी (अपेक्षित)
रवा १०%
साखर ६०%
चणाडाळ ४०%
तेल ३०%