Maharashtra Weekly Weather Forecast : मुंबईत सोमवारी कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. AQI 60 नोंदवला गेला आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, या आठवड्यात महाराष्ट्रात उष्णतेपासून दिलासा कायम राहील, तसेच आजपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात, मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अधून मधून  पाऊस आणि मेघगर्जनेसह अंशतः ढगाळ आकाश दिसेल. हवामान खात्याचे म्हणणे आहे की महाराष्ट्रात किमान 4 ते 5 दिवस अगोदर मान्सून दाखल होऊ शकतो. दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'उत्तम ते मध्यम' श्रेणीत नोंदवला जात आहे. या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. या आठवड्यात महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. 


मुंबई


सोमवारी मुंबईत कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 60 वर नोंदवला गेला आहे.


पुणे
पुण्यात कमाल तापमान 36 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 70 वर नोंदवला गेला आहे.


नागपूर


नागपुरात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आठवडाभर अंशतः ढगाळ आकाश दिसू शकते. सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 42 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 104 आहे, जो 'मध्यम' श्रेणीत येतो.


नाशिक


नाशिकमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आठवडाभर अंशतः ढगाळ आकाश दिसू शकते. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 61 आहे.


औरंगाबाद


औरंगाबादमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या आठवड्यात हलके ढगाळ आकाश राहील. शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 38 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 22 आहे.