Maharashtra Weather : राज्यातील काही भागात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढलेला दिसत आहे. तर काही भागात पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती.
'या' दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आनवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
या भारातही पावसाची शक्यता
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
15 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडणार
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून पाूऊस राज्यातील विविध भागात विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सध्या 15 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता आहे. त्यानंतर 27पासून पुन्हा मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यायवर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस
दरम्यान, यायवर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपे७ा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.
महत्वाच्या बातम्या: