एक्स्प्लोर

Weather Update : नव्या वर्षात मुंबईचा पारा घसरला, हुडहुडी वाढली; हवामान विभागाचा अंदाज काय?

Weather Update News : मुंबईत किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. त्यामुळं थंडी चांगलीच वाढली आहे.

Weather Update News : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबईतही किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर 15.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं नवीन वर्षात मुंबईत हुडहुडी वाढली आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस तापमान कमीच राहणार आहे.

आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं थडी वाढली आहे. कुलाब्यात 18.05 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. देशातील अनेक भागात थंडीचा काडाका वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात गारठा चांगलाच वाढला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये तापमानात घट झाली आहे.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा (Mumbai Air quality) बिघडल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेला आहे. तर नवी मुंबईतही हवा गुणवत्ता निर्देशांक 342  अतिशय वाईट पातळीच्या जवळ पोहोचला आहे.  मुंबई शहराचा एक्यूआय 303 वर अतिशय वाईट स्थितीत गेला आहे. तर  मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावचा एक्यूआय 300 वरून वाईट अत्यंत खराब' पातळीच्या जवळ पोहोचली  आहे.

उत्तर भारतात थंडी वाढणार 

भारतीय हवामानशास्त्र विभागानं  दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा पारा (North India) आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिमालयातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळं वायव्य भारतातील मैदानी भागात किमान तापमानात घट झाली आहे. तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. दिल्लीत तापमानाचा पारा हा 10 अंश सेस्लिअसच्या आसपास घसरला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर भारतात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Weather Update : नवीन वर्षात थंडीचा जोर वाढणार, का वाढतेय हुडहुडी? वाचा हवामान विभागाचा अंदाज

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget