एक्स्प्लोर

IMD Forecast Maharashtra: राज्यात पुढील 5 दिवस तापमानात मोठे बदल, पावसाची शक्यता, वाचा IMD चा सविस्तर अंदाज

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यताय. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय.

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय.

गेल्या काही दिवसात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. 4 ते 5 अंशांवर असणारं किमान वाढलं असून राज्यात शनिवारी मध्य व उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15- 18 अंशांपर्यंत गेलं होतं. पुण्यात थंडीचा कडाका कमी झाला असून शनिवारी 13-18 अंश तापमान होतं. मराठवाड्यात बहुतांश भागात गारठा कायम असला तरी किमान तापमान वाढले आहे.

राज्यात पुढील 5 दिवस कसं राहणार तापमान?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

शनिवारी कुठे काय होतं तापमान?

राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढलाय. मुंबईत कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये किमान तापमान 20 अंशांवर गेलं होतं.गारठलेल्या नाशकात 12 ते 18 अंशांची नोंद करण्यात आली. नगरमध्ये 13 अंश सांगली सातारा सोलापूरमध्ये 16 ते 18 अंश तापमान नोंदवलं गेलं. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, चंद्रपूर, गोंदिया, धुळ्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 19 अंश होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget