Maharashtra Weather Update : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने (Temperature) उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची (Monsoon Has Arrived In India) चाहूल लागली असताना नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसाकरिता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोबतच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 


चिपळूण पोलिसांचं वाशिष्ठी नदीमध्ये माँकड्रिल


हवामान विभागाने दिलेल्या इशारानंतर आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना मुसळधार पावसामुळे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्काळात नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, किंवा पाण्यामध्ये कोणी बुडत असल्यास त्याला वाचवता यावं, यासाठी चिपळूण पोलिसांच्या माध्यमातून वाशिष्टीच्या नदीपात्रात माँकड्रिल करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या टीम मधील तरबेज असलेल्या कर्मचाऱ्यांना पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्याला कशा पद्धतीने वाचवले पाहिजे, याचे प्रत्यक्ष ट्रेनिंग देण्यात आले. कोकणात मान्सून सक्रिय झाला असून येत्या काळात नद्यांना येणारा पूर आणि निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन चिपळूण पोलिसांनी खबरदारी घेत हे प्रात्यक्षिक केल्याचे सांगितले आहे. 


विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज


रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसाकरिता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सर्वांनी सतर्क रहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तासात रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सतर्क राहण्याच्या नागरीकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 30 ते 40 किमी प्रतीतास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


कोकणातील शेतकरी राजा चांगलाच सुखावला


रायगडमध्ये पावसाची गर्जना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माणगाव या भागांत पाऊस सुरु आहे. हा पाऊस भात पेरणीसाठी लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. तळकोकणात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कोकणातील शेतकरी राजा, मात्र चांगलाच सुखावला आहे. रायगड जिल्ह्यात देखील आजपासुन पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या