Maharashtra Weather : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.

abp majha web team Last Updated: 26 Jun 2023 11:26 AM
Marathwada Rain Update: मराठवाड्यातील 'या' तीन जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता
Marathwada Rain Update: हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. Read More
Maharashtra Weather : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Monsoon Update : पुढील 48 तासांत मुंबई, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. Read More
Monsoon Update : हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी, पर्वतीय भागात अलर्ट जारी
Monsoon Update In India : देशभरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान,  राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. 


राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी


राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. 


कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.


शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या


राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.