Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात (Weather)  हळूहळू बदल होत आहे. कुठं थंडीची चाहूल तर कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे. सध्या राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. उद्यापासून (17 नोव्हेंबरपासून) महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता कायम असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. 


हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी


माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसानंतर उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा येऊ घातलेले नवीन पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळं महाराष्ट्रात अधिक थंडी जाणवण्यासही मदत होईल, असे वाटते. आज बंगालच्या उपसागरात सध्या अस्तित्वात असलेले अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे उद्या (दि.17 नोव्हेंबरला) चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच त्याचे नामकरण होवून परवा शनिवार (दि.18 नोव्हेंबरला सकाळी बांगलादेश किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता जाणवते. 


कोणत्याही प्रकारे पावसाची शक्यता नाही


19 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 23 नोव्हेंबरच्या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली ह्या जिल्ह्यात वातावरण काहीसे ढगाळलेले राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात काहींशी वाढ होवून वातावरणात ऊबदारपणा जाणवण्याची शक्यता खउळे यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व असले तरी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्र अथवा चक्रीय वादळ निर्मिती शक्यतेतून नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही.  दरम्यान, सध्याच्या वातावरणातील स्थितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि तामिळनाडू, केरळातील ईशान्य हिवाळी मान्सूनच्या गतिविधितेला चालना मिळत असल्याचे खुळे म्हणाले.


दरम्यान, देशातील काही भागात देखील हवामानात बदल होत आहे. देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस वातावरण थंड राहील.


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update : देशात थंडीचा कडाका, तर 'या' भागात पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय?