Maharashtra weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठ उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. अशातच महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) कधी दाखल होणार अशी चर्चा सुरु आहे. तर 8 ते 10 जुनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील तीन दिवस मुंबईसह (Mumbai) कोकणात ढगाळ वातावरणसह दमटयुक्त उष्णता राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मामिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. तसेच राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडण्याचा अंदाजही त्यांनी वर्तला आहे.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीमुसार, 3 जूनपासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली या 9 जिल्ह्यात फक्त पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील उर्वरित 27 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. मुंबईसह कोकणात मात्र ढगाळ वातावरणसह पुढील तीन दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येणार असल्याचे खुळे म्हणाले.
चार ते पाच दिवसात मान्सून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
येत्या चार ते पाच दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे मामिकराव खुळे म्हणाले. पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीनेही होवु शकते असे वाटते. 'रेमल ' चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर 30 मे ला पोहोचला असला तरी, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत 10 जून दरम्यानच पोहोचण्याची शक्यता जाणवते.
थोड्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणीचं धाडस करु नये
सध्याची एकंदरीत वातावरणीय स्थिती पाहता, पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरीप पेर तयारीसाठी शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण 20 जून दरम्यान पर्यंतही कदाचितवाट पहावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते. पेरणी तर होणारच आहे, पण सध्याच्या या वातावरणीय पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अति आत्मविश्वासावर, उगाचच धूळ-पेरणी वा बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करु नये, असा सल्ला माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळं चांगला पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करणं गरजेचं असल्याचे खुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: