Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात शनिवारीही अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेने यावर्षी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 2 मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक जाणवणार, कधी होणार हवामानात बदल?
याआधी हवामान खात्याच्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णता होती. यावेळी कमाल तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शनिवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
मुंबई
शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाशात हलके ढग असतील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 110 वर नोंदवला गेला.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 120 वर नोंदवला गेला.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 93 आहे, जो 'समाधानकारक' श्रेणीत येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 68 आहे.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीतील 106 आहे.
महत्वाच्या इतर बातम्या
- Raj Thackeray Majha katta : भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा : राज ठाकरे
- Uday Samant : अखेर 'त्या' वक्तव्यावर उदय सामंतांनी मौन सोडले; म्हणाले...
- CNG Price Hike: मुंबईत सीएनजी दरवाढीचा भडका; प्रतिकिलो सीएनजीसाठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये
- देशात पुन्हा लॉकडाऊन? लोकांना मिळणार आणखी एक बूस्टर डोस? कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान करणार चर्चा