Maharashtra Weather Forecast : हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्याच्या विविध भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या खाली नोंदवले जात आहे. त्याचबरोबर किमान तापमानही 25 अंशांच्या आसपास नोंदवले जात आहे. अशा स्थितीत पुढील काही दिवसांसाठी आकाश ढगाळ तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या तरी उष्णतेपासून दिलासा कायम राहणार आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते मध्यम' श्रेणीत नोंदवला जात आहे. बुधवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.


मुंबई (Mumbai Weather Today)


मुंबईत, बुधवारमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. 30 मे पर्यंत ढगाळ वातावरण आणि मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 65 इतका नोंदवला गेला आहे.


पुणे (Pune Weather Today)


पुण्यात कमाल तापमान 37 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहील. 31 मे पर्यंत असेच वातावरण राहील. 'समाधानकारक' श्रेणीत हवेचा दर्जा निर्देशांक 57 वर नोंदवला गेला आहे.


नागपूर (Nagpur Weather Today)


नागपुरात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 31 मे पर्यंत हवामान असेच राहील. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 129 आहे, जो 'मध्यम' श्रेणीत येतो.


नाशिक (Nashik Weather Today)


नाशिकमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. 26, 27 आणि 28 मे रोजी हवामान स्वच्छ राहील. याशिवाय 29 आणि 30 मे रोजी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीतील 109 आहे.


औरंगाबाद (Aurangabad Weather Today)


औरंगाबादमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी आणि गुरुवारी हवामान स्वच्छ राहील. यानंतर 30 मे पर्यंत आकाशात हलके ढग दिसतील. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 43 आहे.