Buldhana Water Crisis : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि पाच मध्यम जलाशयात पाणीसाठा कमी जमल्याने यावर्षी जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.


तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात आवघा 11. 62 % पाणीसाठा उरला असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठयात मोठी घट झाल्याने पुढील दोन महिन्यात अजूनही जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


बुलढाणा जिल्ह्यात आवघा 11.62 % पाणीसाठा 


2023-24 या वर्षात मान्सून मध्ये बुलढाणा जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडला. तर धरणाच्या कॅचमेंट एरियात सुद्धा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्प हे भरलेच नाही. त्यामुळे आता उन्हाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पावसाळा संपला त्यावेळी जिल्ह्यात सरासरी 63 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी हा जलसाठा बाष्पीभवन व इतर कारणांनी घटल्याने सध्या जिल्ह्यात फक्त अकरा पूर्णांक 62 टक्के जलसाठा उरलेला आहे. अजूनही पावसाळ्याला दोन महिने बाकी आहेत त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.


शहरी भागात 10 तर ग्रामीण भागात 12 दिवसांनी पाणी पुरवठा 


बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे आणि यामुळे जिल्हा प्रशासनाने जवळपास दीडशेच्या वर गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भविष्यात पावसाळा अजूनही दोन महिने दूर आहे. अशातच प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई उद्भवत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे जरुरी आहे. जिल्ह्यातील अनेक शहरी भागात 10 दिवसांनी तर ग्रामीण भागात 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय. तर आगामी काळात हे दिवसांची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


राज्यात 'पाणीबाणी'   


राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठयाची परिस्थिती सध्या बुलढाण्यासारखीच आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पात जलसाठा जमलाच नाही आणि त्यामुळे परिस्थिती भीषण आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नाथसागर प्रकल्प असू देत किंवा बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प,  अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पात जलसाठा शून्य झाल्याने आगामी काळात आता राज्यात भीषण पाणी टंचाई उद्भवणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देणेही गरजेचं आहे. 


बुलढाणा जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प सध्याचा जलसाठा



  • नळगांगा प्रकल्प -     25.36%

  • खडकपुर्णा प्रकल्प -   00.00%

  • पेणटाकळी प्रकल्प -  15.21 %


इतर महत्वाच्या बातम्या