धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीला (Tuljapur) नमन करतो, आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. आज या धरतीवर आई तुळजाभवानी व जनताजनार्दनाकडून आशीर्वाद घेण्यासाठी मी आलोय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) धाराशिवमधील आपल्या भाषणाची सुरुवात केली. नरेद्र मोदींनी आज महाराष्ट्रात सभांची हॅटट्रीक करण्याचा निर्धार केला असून माळशिरस येथील पहिल्या सभेनंतर धाराशिवमध्ये दिवसातील दुसरी सभा मोदींनी घेतली. धाराशिवमधील सभेतही मोदींनी काँग्रेस नेत्यांवर आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच, राम मंदिराचा मुद्दा, भारताचं जगभरात होत असलेलं कौतुक सांगताना, अमिरेकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या निमंत्रणाचा उल्लेख केला. येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा विकास करण्यासाठी महायुतीचं सरकार काम करत असल्याचे सांगत मोदींनी स्थानिक मुद्द्यांकडे लक्ष वेधले. लातूर टेंभुर्णी महामार्ग व शक्तीपीठ महामार्गाचाही उल्लेख केला. यावेळी, सोयाबिन उत्पादक (Farmer) जिल्हा असेल्या धाराशिवकरांना काँग्रेस व मोदी सरकारच्या कार्यकाळातील माहिती देत साद घातली. 


धाराशिवमधून एकेकाळी एकच ट्रेन धावत होती, आज 2 डझन रेल्वे येथून धावत आहेत. तुळजापूर-सोलापूर रेल्वे महामार्गाचा उल्लेख करत मोदींनी स्थानिक मुद्द्यांवरुन स्थानिक मतदारांना साद घातली. तर, येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन केलं. यावेळी, मोदींनी स्थानिक सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दाही भाषणातून उपस्थित केला. येथील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्या भाषणातून नेहमीच पंतप्रधान मोदींची नक्कल करत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन प्रश्न उपस्थित करतात. त्यामध्ये, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्यांना गांभीर्याने घेत, 11 हजार रुपयांचा सोयाबिन 4 हजार रुपयांवर आल्याचं सांगतात. त्यात, आज नरेंद्र मोदींनी सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना उद्देशून येथे भाषण केले. 


मी आपल्या सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, 2014 पूर्वी 10 वर्षात केवळ 12000 कोटी रुपयांचे दहलन, तिलहन काँग्रेस सरकारने खरेदी केला. तर, गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने जवळपास सव्वा लाख करोड रुपये दलहन, तिलहन शेतकऱ्यांना एमएसपीच्या माध्यमातून पोहोचवले आहे. एनडीए सरकारने काँग्रेस सरकारच्या तुलनेत 10 पट जास्त पैसे दिले आहेत. हा केवळ ट्रेलर असून आता मोदींचे मिशन, हे देशाला तहलन व तिहलनमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवणं असल्याचं मोदींनी म्हटलं. देशाला दाळ आणि तेल खरेदी करण्यासाठी आमचा देश हजारो कोटी रुपये विदेशात पाठवतो, आता मोदींनी निश्चिय केलाय की, तो पैसा आता विदेशात जाणार नसून शेतकऱ्यांच्या खिशात जाईल, असे म्हणत मोदींनी सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना साद घातली. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे ओमराजे निंबाळकरांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न धाराशिवमधील जाहीर सभेतून केल्याचं दिसून येतं. 


ओमराजे निंबाळकरांकडून होतेय टीका


धाराशिवमधील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांकडून विविध ठिकाणी होत असलेल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली जाते. भाईयों और बहनों बताईए, सोयाबिन के भाव कम हुए के नही हुए... असे म्हणत ओमराजे निंबाळकर हे शेतकऱ्यांना साद घालतात. यावेळी, 11000 रुपयांवर पोहोचलेलं सोयाबिन केंद्र सरकारच्या धोरणामुळे 4 हजार रुपयांवर आल्याचं ते सांगतात. दरम्यान, आज मोदींनी सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनाही आपल्या भाषणातून साद घातली आहे. 


हेही वाचा


''माढ्यात गुलाल आमचाच, आजच्या गर्दीने दाखवून दिलं, आता तालुक्यांचा लीड मोजायचा''; मोदींच्या सभेनंतर रणजीतसिंहांच्या पत्नी म्हणतात ..