Wardha : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात विरुळ (आकाजी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी विदर्भामधील पहिली "मोफत पीठगिरणी" कार्यान्वित करण्यात आली आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटीमार्फत हा नाविण्यपूर्ण उपक्रम आणण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून अनेक ग्रामस्थांच्या कुटुंबाचा दळणखर्च वाचणार आहे. या अभिनवपूर्ण उपक्रमाला समजून घेण्यासाठी जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक विरूळ या ठिकाणी येऊन ग्रामपंचायतींना भेट देत आहेत. 


           

पाच हजार लोकसंख्या असलेल्या विरुळ येथील कुटुंबांना मोफत दळण दळून घेता येईल या अनुषंगाने दहा हॉर्स पॉवरची मशीन चक्कीवर बसविण्यात आली आहे. चक्कीला मोफत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर दहा किलो वॅटचे सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. या सोलार पॅनलद्वारे प्रति महिन्याला पंधराशे युनिटची विद्युत निर्मिती स्वतः ग्रामपंचायत करत आहे. निर्मित केलेली वीज विरुळ येथील विद्युत पुरवठा जोडणी ग्रामपंचायत कार्यालय आणि विद्युत वितरण स्टेशन यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्या अनुशंगाने विद्युत स्टेशन कडून त्यांची विद्युत ग्रामपंचायत अंतर्गत चालत असलेल्या मोफत पीठ गिरणीला निरंतर पुरवठा करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची वीजबिल आकारणी होत नाही. तसेच, ग्रामस्थांनासुद्धा मोफत दळून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 

          

कर थकबाकी नसणाऱ्या कुटुंबांना मोफत तर इतरांना वाजवी दरात दळण : 

 

विरुळ ग्रामपंचायत आवारातच पीठ गिरणी उभारण्यात आलेली असून, कर थकबाकी नसलेल्या कुटुंबाना मोफत दळण आणि इतरांना वाजवी दरात दळण दळून दिले जात आहे. तसेच, सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमासाठी वाजवी दरात दळण दळून दिले जात आहे. 

 

महत्वाच्या बातम्या :