Cyber Cell : सोशल मीडियावर जर तुम्ही जातीय पोस्ट करत असाल, तर तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये सायबर पोलिस CrPC च्या कलम 149 अंतर्गत एक नोटीस दिसेल. कारण आतापर्यंत अशा 400 नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला जातीय वाद लक्षात घेऊन सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एक नवीन युक्ती शोधली आहे.
सावधान! सोशल मिडीयावर जातीय पोस्ट कराल तर...
महाराष्ट्र सायबरचे IG यशस्वी यादव म्हणाले की, काही समाजकंटक जातीय तेढ निर्माण टाकणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकतात, मात्र अनेकदा असे घडते की, पोस्ट डिलीट केल्यानंतरही असे लोक पुन्हा पोस्ट करतात, त्यामुळे आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एक नवीन कल्पना मांडली आहे. अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्या लोकांच्या इनबॉक्समध्ये CrPC च्या कलम 149 अंतर्गत नोटीस पाठवली जाते, जेणेकरून त्यांना कळेल की त्यांचा सोशल मीडिया सायबर पोलिसांच्या देखरेखीखाली आहे. सायबरने अशाच प्रकारे जातीय पोस्ट करणाऱ्या नागरिकांच्या सोशल मीडिया इनबॉक्समध्ये सुमारे 400 नोटिसा पाठवल्या आहेत.
सोशल मीडिया मॉनिटरिंग अँड अॅनालिसिस युनिट
या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबरने 4 विशेष टीम तयार केल्या आहेत, जे सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्या युनिटला "सोशल मीडिया मॉनिटरिंग अँड अॅनालिसिस युनिट" असे नाव देण्यात आले आहे आणि हे करण्यासाठी काही खास सॉफ्टवेअर टूल्सचाही वापर करण्यात आला आहे.
15 दिवसांत जातीय पोस्टमध्ये तिपटीने वाढ
IG यादव म्हणाले की, गेल्या 15 दिवसांत जातीय पोस्टमध्ये तिपटीने वाढ झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे, आम्ही त्यावर लक्ष ठेवले आहे. महाराष्ट्र सायबरने गेल्या चार महिन्यांत 12 हजारांहून अधिक पोस्ट डिलीट केल्या असून संबंधितांपैकी 300 जणांवर एफआयआर दाखल केला आहे. मशिदीवरून लाऊडस्पीकरचा वाद सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर जातीय पोस्टचे प्रमाणही वाढले असून त्याचा परिणाम सध्याच्या किंवा भविष्यात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो.
दोन प्रकारची कारवाई
महाराष्ट्र सायबरने आतापर्यंत हजारो पोस्ट शोधून काढल्या असून अशा पोस्ट काढून टाकण्यासाठी आणि अशा पोस्टमागील लोकांवर दोन प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, प्रथमतः त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नोडल अधिकाऱ्यांना पत्र लिहून पोस्ट डिलीट करण्यात येत आहे. याशिवाय त्या प्रोफाइलची सर्व माहिती मागितल्यानंतर संबंधित सायबर युनिटला त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या