एक्स्प्लोर

दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नेमणूक

राज्यभरातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार, गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नेमणूक

मुंबई : आजपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी आहेत. तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिक माहिती दिली. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं. परीक्षा काळातल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी राज्यात 273 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार करू नयेत. दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले. अभ्यास माझा दहावीचा, दहावीचे सर्व विषय समजून घ्या सोप्या भाषेत एका क्लिकवर  : https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRSiniQ9q_u7zM2s5C6BKfKc दहावी परीक्षेआधी वाशिममधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वाशिममधील एका शाळेने विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ दिली आहे. वाशिमच्या नालंदानगर भागातील गौरी शंकर विद्यालयात दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली. कार्यक्रमात आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या गौरी शंकर विद्यालय शालेय शिक्षणाबरोबर दैनंदिन आयुष्यातील कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्याचं काम करतं. शालेय जीवनात कठीण प्रसंगी मी कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आत्महत्या करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शपथ भावी संघर्षमय जीवनात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटतो. तसंच घरातील सगळ्या सदस्यांनाही आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. गुण कमी मिळणं, नापास होण्याची चिंता कायमच विद्यार्थ्यांच्या मनात असते आणि आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचे विचार मनात येतात. मात्र हे  नकारात्मक विचार दूर करण्यासाठी या शाळेने घेतलेला शपथेचा उपक्रम, विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात सकारत्मक  उर्जा आणि बदल घडवणारा आहे. इतर शाळांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिल्यास येत्या काळात 'विद्यार्थी आत्महत्या' शब्द नाहीसा होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Kailas Patil: चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवक फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget