Maratha Reservation Live Updates मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलं.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 20 Feb 2024 04:00 PM
२६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन

कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली


२६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन


कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे.  राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय.

रोहित पवारांचा हल्लाबोल, काय म्हणाले ?

Maratha Reservation Special Assembly session Live Updates :  आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मराठा आरक्षणावर मत मांडले. काय म्हणाले रोहित पवार?



मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल सवर्पक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार! मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ‘आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करुया’ हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतीदायक वाटतात! 


विधेयकाचा मसुदा वरकरणी पाहता त्यात अनेक त्रुटी दिसत असून २८% लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र १० % देण्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला, हे स्पष्ट होत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगासंदर्भात नोंदवलेली निरीक्षणेही दुरुस्त केलेली दिसत नाहीत. एकदरीतच निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये.


असो! हे विधेयक टिकवण्यासाठी सरकारसह सवर्पक्षीय नेते प्रामाणिक प्रयत्न करतील, हा विश्वास आणि अपेक्षा आहे!

Special Assembly session Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका - जितेंद्र आव्हाड

Maratha Reservation Special Assembly session Live Updates :  जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हटले ?



मुख्यमंत्री साहेब, 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!


मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे.आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही.आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल,हे लक्षात असू द्या. 


मुंबईच्या मोर्च्यात 'सगेसोयऱ्यां'वरून दिलेल्या शब्दाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.ज्यांच्या नोंदीच सापडलेल्या नाहीत त्यांचं आरक्षण मराठा समाजावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय.सरकार यासाठी वेळकाढूपणा का करतंय? 


मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली असली तरी ते कायद्याच्या कसोटीवर कितपत उतरेल आणि मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का..? यात शंकाच आहे. 


वाईट तर याचं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि शपथ पूर्ण न करताच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.मराठा आरक्षण जोवर कायद्याच्या कसोटीवर खरे उतरत नाही आणि ते प्रत्यक्षात लागू होत नाही,तोवर या शपथेचं ओझं मुख्यमंत्र्याना वाहावे लागेल,हे लक्षात असू द्या.

जरांगे यांनी दोन पाऊल मागे जावं आणि तब्येतीची काळजी घ्यावी - बच्चू कडू

95 टक्के आत्महत्या मराठ्यांच्या आहेत असे विधेयकात म्हटलं गेले


आरक्षणामुळे कुटूंब सुखी होत


मराठयाला आरक्षण कायदा पारित झाला त्याला वेळ द्यावा


जरांगे यांनी दोन पाऊल मागे जावं आणि तब्येतीची काळजी घ्यावी


सगेसोयरे याच्या अधिसूचनेला काही दिवस जातील


जरांगे यांनी आपलं उपोषण थांबवावं अशी विनंती करतो


मराठयांना आरक्षण भेटल तर ओबीसी आणि मराठा संघर्ष थांबेल


सुप्रीम कोर्टाने फेटाळल म्हणून आता फेटाळले असे होत नाही


शिंदे साहेबानी जी तयारी केली ती मजबूत केलीय


जरांगे यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर लक्षात आणून द्यावे


जरांगे यांनी आता तब्येत जपली पाहिजे

Special Assembly session Live Updates : संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो., असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 


शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी, संभाजीराजे  छत्रपती यांनी ट्वीट केलेय. 

Maratha Reservation Live Updates : . मराठा समाज हा कोणत्याही अनुशंगानं मागास नाही - गुणरत्न सदावर्ते

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : हे आरक्षण एका मराठा कार्यकर्त्यानं लिहिलेल्या अहवालावर दिलेलं आहे. ते कायद्याच्या आधारे टिकणारं नाही. याला लवकरच हायकोर्टात आव्हान देणार आहे. राज्यातील आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. मराठा आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. मराठा समाज हा कोणत्याही अनुशंगानं मागास नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. 

Maratha Reservation Live Updates : कोणालाही धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय - एकनाथ शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मी दसरा मेळाव्यात शपथ घेतली होती की मी ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारं आहे. आज ते प्रत्यक्षात येत आहे. मराठा समाज अडचणीत आला होता. त्यांच्यावरील अनन्या दूर करण्यासाठी आम्ही कोणालाही धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने आरक्षण देणारं हा शब्द दिला होता. बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे शब्द दिला की तो पूर्ण करायचाचं. ( उध्दव ठाकरे या वाक्यावर खुप हसले) 


जरांगे यांना भेटायला गेलो त्यावेळीं त्यांना आरक्षण देणारं आहे असे शब्द दिला होता. मागे देखील मी शब्द दिला आणि त्यानंतर तो पूर्ण केला. आता मागचा इतिहास पूढे आणणार नाही. आज माझं तोंड कडू करणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे. मनोज जारांगे पाटिल यांना विनंती करतो की दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. मागील पाच सहा महिन्यात अनेक आंदोलने झाली काहीं ठिकाणीं दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी स्थिती झाली होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : सगळ्या आकड्यांचा खेळ - राजेश टोपे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : आकडेवारी 16, 13 आणि 10 असा आकडेवारीचा खेळ आहे. मागे कोर्टात टिकलं नाही तेच आरक्षण दिले आहे. कोर्टात टाकणारं आरक्षण देतील असे अभिप्रेत होतं. लवकरच आचार संहिता लागणार आहेत..त्यामुळे सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बिल आणलं आहे. आर्टिकल 15/4 मध्ये टिकणारे आरक्षण हवं होतं. आम्हाला बोलायचं होतं पण बोलू दिलं नाही. मुख्यमंत्री यांचे भाषण संपल्या संपल्या बिलाला मंजुरी दिली. आज जरांगे पाटील यांची मागणी आहे तात्काळ मंजुरी द्यावी. कुणबी आणि मराठा समाजात नाते सबंध आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळायला हवं यावर काहीही भाष्य केले नाही. तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे अशी जरांगे यांची मागणी होती, पण ती देखील मागणी मान्य केली नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

Special Assembly session Live Updates : मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत विधेयक मांडले

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा आरक्षणा संदर्भातील महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक २०२४ विधेयक मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत मांडले. मुख्यमंत्री विधान परिषदेत बोलत आहेत. सभागृहात उद्धव ठाकरे बसले आहेत. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मनोज जरांगे काय म्हणाले

मागेही स्वागत केलं होतं.
आताही दीडशे जणांसाठी केलंय, त्याच ही स्वागत केलंय.
आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारं हे राज्यापुरतं 
सरकारने दिलेले आरक्षण दोघा तिघांची मागणी,
माननीय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना 6 महिन्याचा वेळ दिला
प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही
आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे
हरकती चा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही
आम्ही वेळ दिलाय संयम ठेवलाय
हरकतींसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे
उद्या 12 वाजता अंतरवली मध्ये निर्णायक बैठक, आंदोलनाची उद्या दिशा ठरणार


मुख्यमंत्री यांच्यावर आजवर विश्वास ठेवला ,आता ठेवायला हरकत नाही
निवडणूक आहे तो पर्यत टिकेल ,उद्या उडाले की बसा बोंबलत
आम्हाला त्या लफडयात पडायचं नाही, ते टिकेल की नाही ,आम्हाला सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी
सलाईन लगेच काढून टाकतो


सग्या सोयऱ्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणीतरी काम करू देत नाहीये
अंमलबजावणी होई पर्यत उपचार घेणार नाही


दिलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत केले, मात्र मराठ्याची ही मागणी नाही
मी हटू शकत नाही
उद्या बैठक घेऊन राज्यभरात आंदोलनाची दिशा ठरणार
आजवर मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवलाय
कोणाच्या तरी दडपणाखाली त्यांनी निर्णय घेतलाय
त्यांच्यावर विश्वास ठेवून 6 महिने वेळ दिलाय
ते कसे अंमलबजावणी करत नाही तेच बघतो
आमचं एवढंच म्हणणे अमलबजावणी  चा विषय गांभीर्याने घ्यायला हवा होता
तुम्ही गोरगरीब मराठ्याची चेष्टा करू लागलेत
आंदोलनाचा शेवट सांगायचं नसतो
आम्ही मनापासून स्वागत केलंय,
पण करोडो लोकांच्या मागणी ला प्राधान्य दिले पाहिजे
जो समाज राजगादी वर बसतो ,त्याला  टाळता का
उपचार बंद करणार
सरकार चे सलाईन का घ्यायचे

Maratha Reservation Live Updates : हे १० टक्के वेगळं आरक्षण आहे. सगेसोयरे हा वेगळा विषय

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : हे 10 टक्के वेगळं आरक्षण आहे. सगेसोयरे हा वेगळा विषय आहे. कुणबी म्हणून आरक्षण घेतलं तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळेल. आता मिळालेले आरक्षण हे ५० टक्के ओलांडून मिळाला आहे.  सगेसोयरे अंमलबजावणी झाली तर मराठा समाजाकडे दोन पर्याय असतील. सगेसोयरे लागू कधी करणार त्याबाबत सरकारने निर्णय केला पाहिजे. यावेळी न्यायालयातही आरक्षण टिकू शकेल . आपण गेल्यावेळी केलेल्या चुकांमधून शिकलेलो आहोत.गेल्यावेळी अवैध ठरल म्हणजे यावेळी पण अवैध ठरेल असा अर्थ काढायचं कारण नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

Maratha Reservation Live Updates : अबु आझमी यांनी कागद फाडले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : विधानसभेत बोलायला संधी दिली नाही म्हणून सपा आमदार अबु आझमी यांनी कागद फाडले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : फटाके फोडून, ढोल ताशा वाजवून गुलाल उधळला

Special Assembly session Live Updates : विधान भवनासमोरच जल्लोष केला जातोय, फटाके फोडून, ढोल ताशा वाजवून गुलाल उधळला जातोय, यावेळी मराठा समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर हे आरक्षण टिकावे यासाठी कोर्टात देखील वकिलांची फौज उभी करा अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत

Special Assembly session Live Updates : हे फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा सरकारने समाजाची फसगत केली

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : आम्ही एक पत्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना दिले होते. मुख्यमंत्री यांनी आमच्या प्रश्नाला बगल दिली. आतापर्यंत दोन वेळा आरक्षण दिले पण ते टिकू शकले नाही. हे फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा सरकारने समाजाची फसगत केली. 10 टक्के आरक्षण देत असताना याला ठोस आधार नाही, असे विरोधीपक्षनेते वडेट्टीवार म्हणाले. 


हे कायद्यात टिकणारे आरक्षण नाही. यांना निवडणूक काढून घ्यायची आहे. मागे झालं तसच सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मत घेण्यासाठी सरकारने हे फसवं काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : आरक्षणाचे आम्ही स्वागत केले, मात्र मराठ्याची ही मागणी नाही

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : दिलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत केले, मात्र मराठ्याची ही मागणी नाही. मी हटू शकत नाही. उद्या बैठक घेऊन राज्यभरात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आजवर मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवलाय. कोणाच्या तरी दडपणाखाली त्यांनी निर्णय घेतलाय. त्यांच्यावर विश्वास ठेवून 6 महिने वेळ दिलाय. ते कसे अंमलबजावणी करत नाही तेच बघतो. आमचं एवढंच म्हणणे अमलबजावणी  चा विषय गांभीर्याने घ्यायला हवा होता. तुम्ही गोरगरीब मराठ्याची चेष्टा करू लागलेत. आंदोलनाचा शेवट सांगायचं नसतो. आम्ही मनापासून स्वागत केलंय, पण करोडो लोकांच्या मागणी ला प्राधान्य दिले पाहिजे. जो समाज राजगादी वर बसतो ,त्याला  टाळता का, असे मनोज जरांगे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : तोपर्यत उपचार घेणार नाही - मनोज जरांगे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : सग्यासोयऱ्याबाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणीतरी काम करू देत नाहीये. याबाबत अंमलबजावणी होईपर्यत उपचार घेणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : मनोज जरांगेंनी उपचार घेणं बंद केले

Special Assembly session Live Updates : निवडणूक आहे तो पर्यत टिकेल ,उद्या उडाले की बसा बोंबलत. आम्हाला त्या लफडयात पडायचं नाही, ते टिकेल की नाही ,आम्हाला सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. सलाईन लगेच काढून टाकतो, असे म्हणत मनोज जरांगेंनी उपचार घेणं बंद केलेय. 

Special Assembly session Live Updates : आंदोलनाची दिशा उद्या ठरणार - मनोज जरांगे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : माननीय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना 6 महिन्याचा वेळ दिला. प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. हरकती चा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही. आम्ही वेळ दिलाय संयम ठेवलाय. हरकती साठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. उद्या 12 वाजता अंतरवली मध्ये निर्णायक बैठक, आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे. मुख्यमंत्री यांच्यावर आजवर विश्वास ठेवला ,आता ठेवायला हरकत नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : बबनराव तायवडे काय म्हणाले ?

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा आरक्षण विधेयक एक मताने मंजूर झाले त्याचे राष्ट्रीय ओबीसी संघाने स्वागत केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही ओबीसी समाजाची आधीपासून मागणी होती. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार याचा आम्हाला आनंद व्यक्त केला. आरक्षण मिळाल्यानंतर आता आंदोलनासाठी काय शिल्लक आहे हा  प्रश्न आम्हाला पडला आहे, असे बबनराव तायवाडे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : मनोज जरांगे आणखी किती धमक्या देणार - भुजबळ

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही.  मात्र मुख्यमंत्री यांनी ज्या जरांगे पाटील यांचा उल्लेख केला ते नेहमी धमक्या दिल्या. ⁠मला आईवरती शिव्या दिल्या. ⁠मुख्यमंत्री यांना शिव्या दिल्या. या धमक्या काही बंद करणार आहेत की नाही.⁠ते आता म्हणत आहे की आंदोलन मागे घेणार नाही. ⁠हे काय सुरु आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. 

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

Maratha Reservation Live Updates : तीन महिन्यात निर्णय घेतला - एकनाथ शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांत हा निर्णय घेण्यात आला आहे. ⁠हा सॅंपल सर्व्हे नाही तर डिप सर्व्हे आहे. ⁠अडीच ⁠कोटी लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. ⁠सरकार कोणताही दुजाभाव करणार नाही. ⁠घाईगडबड करणं योग्य नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेत आहेत. ⁠सरकार जे बोलत ते करत हे आंदोलनं करत्यानी समजून घेतलं पाहिजे. एकमताने हे विधेयक मंजूर करावा अशी विनंती करत आहे.  टिकणार हे विधेयक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : सहा लाख हरकती आल्यात - शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या त्या पूर्ण करण्याचं काम करत आहे. आरक्षण टिकून रहावं यासाठी राज्य सरकार सर्व ताकद लावणार आहे. ⁠विरोधी पक्षांना ही सोबत ठेवणार आहे. ⁠कुणबी दाखला संदर्भात ही समिती काम करत आहे.  सहा लाख हरकती आलेल्या आहेत. ⁠यावर प्रक्रिया सुरु आहे. ⁠जी अधिसूचना काढली आहे त्यावर हरकती आल्या आहेत. त्यावर छाननी सुरू आहे. ⁠त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. ⁠१९६७ पुर्वी नोंदी आहे, त्यांना आरक्षण दिलं जाईल.  ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : आरक्षण टिकावं त्यासाठी राज्य सरकार संपूर्ण ताकद लावणार - एकनाथ शिंदे

आरक्षण टिकावं त्यासाठी राज्य सरकार संपूर्ण ताकद लावणार


कोर्टानं नमूद केलेल्या त्रुटी दूर केल्या. 


367 कोटी रुपये मागासवर्ग आयोगाला तात्काळ निधी दिला.


सर्वेक्षण अचुक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलं. 

Special Assembly session Live Updates : गोड दिवशी कडू नको - एकनाथ शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार आरक्षण देत आहे. ⁠मागे काय झालं हे बोलत नाही. ⁠गोड दिवशी कडू नको, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा समजाकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत होणार

Special Assembly session Live Updates : विधीमंडळातल्या भाषणानंतर मराठा समजाकडून आझाद मैदानात जल्लोष करण्यात येणार आहेत मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे.

Special Assembly session Live Updates : ⁠२२ राज्यात ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण - एकनाथ शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : हा कायदा कोर्टात टिकेल याची खात्री बाळगा. आपण काहीही बेकायदेशीर करत नाही. ⁠कायदेशीर आपण सर्व करतो.  ⁠२२ राज्यात ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण आहे.  ⁠५० टक्के आरक्षण मर्यादा आपण ओलंडली. ⁠सुप्रीम कोर्टाने आपल्याला अधिकार दिलाय. ⁠कायदेशीर हा कायदा टिकेल. ⁠या आंदोलनात काही मृत्यू ही झाले. ⁠त्यांच्या संदर्भात संवेदना व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : अनेक राज्यात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली - एकनाथ शिंदे

Special Assembly session Live Updates : मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं स्विकारलाय. विधेयक मंजूर झालेय. कोर्टात टिकेल की नाही... पाहूयात.. आपण सकारात्मक राहूयात. बिहार, तामिळनाडू, हरियाणामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त आरक्षण आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : आंदोलनं राज्याच्या विकासाला न परवडणारी - शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : काही घटना घडल्या, त्या घडायला नको होत्या. ⁠ही आंदोलनं राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत. अनेकांना वाटतं की चुटकीप्रमाणे निर्णय झाला पाहिजे. ⁠आचार संहिता लागेल मग कसं होणार या संदर्भात माझ्यावर काही आरोप ही झाले. ⁠दिडशे दिवस हे अहोरात्र काम सुरु होतं. ⁠तीन ते चार लाख लोक काम करत होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

CM Eknath Shinde on Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 


- विरोधी पक्षनेते यांनी मला याबाबतीत मला मुद्दे आणि पत्र दिले आहे 
- ⁠त्यामुळे या संदर्भात मला स्पष्टीकरण देत आहे
- ⁠कालच शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी केली
- ⁠शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन आरक्षण देण्याची शपथ घेतली होती
- ⁠हे सर्व महाराष्ट्राने पाहील आहे
- ⁠मला मराठा समाजाच्या वेदनांची माहीत आहे
- मी राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे एका जाती धर्माचा विचार करता येणार नाही
- त्यामुळे इतर समजासाठी ही तीच भावना आहे 
- ⁠सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य मोदी साहेब यांनी दिल आहे
- ⁠एकाची बाजू घेणायच माझ्याकडून होणार नाही
- ⁠कोणतयाही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आहे
- ⁠आपण सर्वजण एकाच मताचे आहोत
- ⁠नोकरी आणि  शैशैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे
- आजचा दिवस ही कर्तव्यची जाणीव करुन देणार आहे
- ⁠ना कोणावर अन्याय नी कोणाला धक्का असा निर्णय घेत आहे
- ⁠ मुख्यमंत्री आसलो तरी आंदोलकांना भेटलो
- ⁠तुमचयापेक्षा जनता मोठी आहे तसं यामुळे त्यांना पहिलं भेटा अस बाळासाहेब म्हणाले होते
- एकनाथ शिंदे यांनी वेळ मारुन नेतील अस काही जण म्हणाले
- ⁠मात्र शब्द देताना शंभरवेळा विचार करतो 
- ⁠तो मी पाळतो
- ⁠यावर मला राजकिय बोलायचं नाही
- ⁠मात्र जयंत पाटील मी शब्द दिला की तो मी पाळतो
- काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या
- ⁠ही आंदोलन राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत
- ⁠ अनेकांना वाटत की चुटकी प्रमाणे निर्णय झाला पाहीजे अस अनेकांना वाटत
- ⁠आचार संहिता लागेल मग कस होणार या संदर्भात माझ्यावर काही आरोप ही झाले
- ⁠दिडशे दिवस हे अहोरात्र हे काम सुरु होत
- ⁠तीन ते चार लाख लोक खाम करत होते

Special Assembly session Live Updates : ⁠ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का - एकनाथ शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. ⁠ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का असा निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री आसलो तरी आंदोलकांना भेटलो.  ⁠तुमच्यापेक्षा जनता मोठी आहे.  यामुळे त्यांना पहिलं भेटा असं बाळासाहेब म्हणाले होते. ⁠ एकनाथ शिंदे यांनी वेळ मारुन नेतील असं काही जण म्हणाले. मात्र शब्द देताना शंभरवेळा विचार करतो. ⁠तो मी पाळतो, ⁠यावर मला राजकिय बोलायचं नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ले.

Maratha Reservation Live Updates : शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन आरक्षण देण्याची शपथ घेतली होती - शिंदे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : विरोधी पक्षनेते यांनी मला याबाबतीत मला मुद्दे आणि पत्र दिले आहे. ⁠त्यामुळे या संदर्भात मला स्पष्टीकरण देत आहे. ⁠कालच शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी केली. ⁠शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ⁠हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. ⁠मला मराठा समाजाच्या वेदनांची माहिती आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे एका जाती धर्माचा विचार करता येणार नाही. त्यामुळे इतर समजासाठी ही तीच भावना आहे. ⁠सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य मोदी साहेब यांनी दिलं आहे. ⁠एकाची बाजू घेण्याच माझ्याकडून होणार नाही. ⁠कोणतयाही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एकाच मताचे आहोत. ⁠नोकरी आणि  शैशैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : एकमतानं मंजूर

Special Assembly session Live Updates :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटलावर मराठा आरक्षण विधेयक मांडलं. एकमताने विधेयक मंजूर झालेय. 

Special Assembly session Live Updates : तायवाडेंनी दिला मंडल आयोगाचा दाखला

Special Assembly session Live Updates : मंडल आयोगाने आपल्या अहवालात मराठा समाजाचा उल्लेख प्रगत जात व समुदाय असा केला. त्यामुळे  मराठा समाजाला आरक्षण देतांना राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकार यांच्या मर्यादा आहे. राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगाने मराठा मागास असल्याचे शिपारशी शिवाय मराठा समाजाचा ओबीसीच्या आरक्षणात विचार होऊ शकत नाही. हे मनोज जरांगे यांनी समजून घ्यायला पाहिजे. सगेसोयरे आद्यदेशा संदर्भात आक्षेप व त्यानंतरची प्रक्रिया सुरु असतांना आम्ही म्हणतो, म्हणून शासन निर्णय घ्या असे होत नसल्याचे बबनराव तायवाडे म्हणाले. सध्याच्या परिस्थिती मनोज जरांगे यांनी प्रतीक्षा करण्याचा सल्ला बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांना दिला. 

Special Assembly session Live Updates : विरोधकांचा आक्षेप

Special Assembly session Live Updates : राज्यपाल यांचा प्रस्ताव टेबल न करता थेट मराठा आरक्षण विधेयक घेतल्याने विरोधकांचा आक्षेप

Special Assembly session Live Updates : मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव सादर

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव एकमतानं मंजुर झालाय. 

मराठा आरक्षण विधेयक पटलावर मांडले

मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मांडण्यास सुरुवात, विधेयकावर केवळ मुख्यमंत्री बोलणार

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा आरक्षण विधेयकावर सर्वच पक्षातील नेत्यांची सावध भूमिका

मराठा आरक्षण विधेयकावर सर्वच पक्षातील नेत्यांची सावध भूमिका


मराठा आरक्षण विधेयक बिनविरोध पारित केले जाणार


कुठल्याही समाजाला न दुखवण्याचा प्रयत्न


काॅग्रेसकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधीमंडळात उत्तर दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व्हीप लागू करण्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभागृहातील उपस्थितीसाठी व्हीप लागू करण्यात आलाय. मराठा आरक्षण विषयक चर्चेसाठी पूर्णवेळ उपस्थित राहण्याची आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 42 आमदार तर शरद पवार यांच्यासोबत 11 आमदार आहेत. 

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाचे अनुमान आणि निष्कर्ष काय?

- आर्थिक परिस्थितीमुळे मराठा समाजाची शैक्षणिक पातळी कमी 
- अपुऱ्या शिक्षणामुळे गरिबीचे वाढते प्रमाण
- दारिद्रय रेषेखाली आणि पिवळं रेशनकार्डधारक मराठा कुटुंब 21.22%
-  सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रमाण कमी
-  84% मराठा समाज प्रगत गटात मोडत नाही, 
- त्यामुळे इंद्रा सहानी खटल्याच्या निकालाप्रमाणे मराठा समाज आरक्षणास पात्र
- मराठा समाजाचा प्राथमिक उत्पन्न स्त्रोत शेती, पण वर्षानुवर्षे स्त्रोत घटत आहे
- दारिद्र्यामुळे मराठा समाज माथाडी, हमाल, शिपाई, ड्रायव्हर, मदतनीस अशी कामे करतो
 - मराठा समाज करत असलेली कामे निम्न दर्जाची
- शेतकरी आत्महत्यांमधील 94% व्यक्ती मराठा समाजातील
- लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला रोजगार आणि शिक्षणात पुरेसं प्रतिनिधीत्व नाही
- बिहार आणि तामिळनाडूने ५० टक्केची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात
- दुर्बल मराठा समाज इतका वंचित वर्ग आहे की त्यांना सध्याच्या मागासवर्गांपेक्षा वेगळे स्वतंत्र वर्गीकरण आवश्यक आहे
- राज्यात मराठा समाज 28% आहे, तर सुमारे 52 टक्के आरक्षण असणाऱ्या प्रवर्गात मोठ्या संख्येने जाती व गट आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देता येणार नाही

Special Assembly session Live Updates : गटनेत्यांच्या बैठकीला सुरूवात

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : गटनेत्यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्हीं उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती यांच्यासह या बैठकीला विजय वडे्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, चंद्रकांत पाटील, कपिल पाटील, जयंत पाटील, नरहरी झिरवाळ, अजय चौधरी उपस्थित आहेत.  बैठकीमध्ये मराठा आरक्षण बील मांडल्यानंतर कुणाला बोलायला संधी द्यायची यावर चर्चा सुरू आहे. बैठकीपूर्वी केवळ गटनेत्यांना बोलायला संधी द्यवी अशी मागणी होती मात्र अनेक आमदारांनी आम्हाला मराठा आरक्षण आणि लोकभावना यावर बोलायचं आहे असा आग्रह धरला आहे.

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : पाच वर्षांत ५ लाख नोकरी निर्मीत केली जाईल

पाच वर्षांत ५ लाख नोकरी निर्मीत केली जाईल. ⁠२००५ च्या आधी सेवेत असलेल्या सरकारी कर्मचारी यांना केंद सरकारच्या धर्तीवर पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार सरकार करत आहे.  ⁠५ हजार ७०० गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे, असे राज्यपाल म्हणाले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : आयोगाचे अनुमान आणि  निष्कर्ष काय?

- आर्थिक परिस्थितीमुळे मराठा समाजाची शैक्षणिक पातळी कमी 
- अपुऱ्या शिक्षणामुळे गरिबीचे वाढते प्रमाण
- दारिद्रय रेषेखाली आणि पिवळं रेशनकार्डधारक मराठा कुटुंब 21.22%
-  सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रमाण कमी
-  84% मराठा समाज प्रगत गटात मोडत नाही, 
- त्यामुळे इंद्रा सहानी खटल्याच्या निकालाप्रमाणे मराठा समाज आरक्षणास पात्र
- मराठा समाजाचा प्राथमिक उत्पन्न स्त्रोत शेती, पण वर्षानुवर्षे स्त्रोत घटत आहे
- दारिद्र्यामुळे मराठा समाज माथाडी, हमाल, शिपाई, ड्रायव्हर, मदतनीस अशी कामे करतो
 - मराठा समाज करत असलेली कामे निम्न दर्जाची
- शेतकरी आत्महत्यांमधील 94% व्यक्ती मराठा समाजातील
- लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला रोजगार आणि शिक्षणात पुरेसं प्रतिनिधीत्व नाही
- बिहार आणि तामिळनाडूने ५० टक्केची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजावर अनन्या होतं नसल्याची स्पष्टता सभागृहांत द्यावी- भुजबळ'

Maratha Reservation Live Updates : मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळ यांनी भुमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अनन्या होतं असल्याची भावना भुजबळांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजावर अन्याय होतं नसल्याची स्पष्टता सभागृहांत द्यावी, असे भुजबळ म्हणाले. 


भुजबळांची भुमिका मुख्यमंत्र्यांकडून मान्य

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे चर्चेत सामील

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : अहवालात नेमकं काय नमूद केलं आहे?

अहवालात नेमकं काय नमूद केलं आहे?


मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे न्या शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला  आढळून आले


सुमारे ५२ टक्के आरक्षण असणार्या मोठ्या संख्येतील जाती व गट  आधीच राखीव प्रवर्गात आहे.


त्यामुळे राज्यातील २८ टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पर्णपणे असामान्य ठरेल अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे

सरकार देतोय ते आरक्षण आम्हाला नको

सरकार देतोय ते आरक्षण आम्हाला नको, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. सरकारनं दिलेले 10 टक्के आरक्षण मनोज जरांगेंनी नाकारलं. 

Special Assembly session Live Updates : मराठा समजाला दहा टक्के आरक्षण

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा समजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिली आहे. थोड्यावेळात एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलती.  मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागस असल्याचेही म्हटले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Special Assembly session Live Updates : नितीन राऊत काय म्हणाले?

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : सरकारने मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे सर्वांसमोर स्पष्ट करावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची देखील भूमिका आहे. मात्र अधिसूचनेबाबत काय करणार?  मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मंजुरी कधी देणार आणि मागील वेळी सुप्रीम कोर्टाने या आरक्षणबद्दल स्पष्ट केलंय त्याच काय? ओबीसी समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असा आमचं म्हणणं आहे, असे नितीन राऊत म्हणाले. 

Special Assembly session Live Updates : टिकणारं आरक्षण द्यावं- रोहित पवार

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : राज्य सरकार जे आरक्षण आणत आहे, ते कोर्टात टिकणारे असावे. याआधी देखील आरक्षण दिले पण कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री आज आरक्षण कसे टिकेल यावर बोलतील अशी अपेक्षा असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. 


आरक्षण देताना सर्व गोष्टीचा विचार करावा, कुणाच्याही भावनांशी खेळू नये. आम्ही आमची नावं बोलण्यासाठी देणार आहोत, सर्व आमदारांना बोलायचं आहे, असेही रोहित पवार म्हणाले. 

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : सगेसोयरेंच्या अधिसुचनेविरोधात साडे सहा लाख हरकती - छगन भुजबळ

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : सगेसोयरेंच्या अधिसुचनेविरोधात साडे सहा लाख हरकती आल्या आहेत. हरकतींचा अभ्यास करावा त्याला वेळ लागेल. जातिनिहाय जनगणना व्हायला हवी. शुक्रे समितीनं काढलेल्या मराठ्यांंच्या आकडेवारीला नाकारतो, असे भुजबळ म्हणाले. 

Maratha Reservation Live Updates : ओबीसी समाजाच्या ताटातला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध आहे

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : ओबीसी समाजाच्या ताटातला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध आहे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. 


 फक्त मराठा समाजासाठीच का विशेष अधिवेशन


 आमची मागणी आहे ओबीसी समाजासाठी देखील विशेष अधिवेशन बोलवावं


 सरकारने जर काही विचार न करता अधिसूचना अंमलबजावणी केली आणि कायदा पारित केला तर आम्ही सरकार विरोधात भूमिका घेऊ


 येत्या निवडणुकात सरकारला त्यांची जागा दाखवू


 आज आमचं ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन होत आहे

Maratha Reservation Live Updates : 13 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : विधिमंडळाच्या आज, मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे. मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला असून त्याआधारे स्वतंत्र संवर्ग करून १० ते १३ टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव सरकारकडून येण्याची शक्यता आहे. 

Maratha Reservation Live Updates : सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील मुद्दा येण्याची शक्यता कमी

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे. सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सूरू असून लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची सूत्रांची माहिती. विरोधकांच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाजात नाराजीचा सूर पाहिला मिळणार आहे त्यावर सत्ताधारी पक्षातील मंत्री छगन भुजबळ यांचा इंटरव्यू करता येईल. कारण सातत्याने त्यांनी अधिसूचनेबाबत हरकती घेतल्या आहेत. 

Maratha Reservation Live Updates : 12 वाजता मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडल जाईल

Maratha Reservation Special Assembly session Live Updates: आज सकाळी 10 वाजता मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजूरी मिळेल. सकाळी 10.55 वाजता राज्यपाल यांच्या अभिभाषणाला सुरुवात होईल. साधारणता 11.45 वाजता राज्यपाल यांच्या अभिभाषण संपेल. 12 वाजता मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडल जाईल. 

पार्श्वभूमी

Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक आज राज्याच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचं (Maharashtra Assembly) आज विशेष अधिवेशन (Special Assembly Session) बोलावण्यात आलं. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी मिळाली. या मंजुरीनंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी मराठा आरक्षण विधेयक पटलावर ठेवलं.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.