मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतल्या तिनही पक्षांत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी काँग्रेसनंही शिवसेनेला मागे टाकलंय. तर अर्थखातं असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे. 



पक्ष               केलेली तरतूद           खर्च (कोटी)


राष्ट्रवादी             235349          224411


काँग्रेस               105985          100024


शिवसेना            66249           52255


विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपुत्र असूनही आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्यालाही मोठा फटका बसलाय. पर्यावरण खात्याकडे 420 कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त तीन टक्के म्हणजे 14 कोटींचा खर्च करण्यात आलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खात्याचीच ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांबद्दल न बोलणंच योग्य ठरेल. 


2020 ते 21 या वर्षातील निधीवाटपाची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक आमदारसंख्या असणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष मात्र यात पिछाडीवर दिसतोय. त्यामुळे किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण निधीवाटपात मात्र समानता दिसत नाही. यामध्ये सर्वाधिक कोंडी शिवसेनेची होत आहे. शरद पवार यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्यामुळे तीन पक्षांना एकत्रित घेऊन सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा करून घेतल्याचे दिसत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :