Narayan Rane : राज्यातील पेपर फुटी प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथे केली. महाविकास आघाडी सरकार गेली दोन वर्षात केवळ निवडणुका, पक्षबांधणीसाठी मंत्रालयात बैठका घेत आहेत. त्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक नसून ते घरी आयसीयुमध्ये बसून आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. जैतापूरच्या मुद्यावर बोलताना राणे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलून उत्तर देईन असं उत्तर दिलं. तर खासदाराचं नाव ऐकलं तरी वीट येत असल्याचं राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या प्रश्नाला उत्तर दिलं. दापोलीत काय चाललंय या आल्तु - फाल्तु प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नसल्याचं राणेंनी म्हटलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे झालेल्या पत्रकार परिषेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सूर काहीसा वेगळा असाच दिसून आला. सुरूवातीपासूनच राणे यांनी आक्रमकपणा दाखवत प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान, जिल्हा बँक आणि नगरपंचायत निवडणूका संपल्याशिवाय जिल्ह्याबाहेर जाणार नसल्याचं राणेंनी म्हटलं. यावेळी चारही नगरपंचायतींवर भाजपची एकहाती सत्ता येईल असं देखील राणे यांनी सांगितलं. कोरोना काळात रूग्णांची काळजी घेण्याचं काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं राणेंनी सांगत कोरोना काळातील मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं राणे म्हणाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर संचयनी अफरातफर संदर्भात कोर्टात केस सुरू आहे. मतदारांनी अफरातफर करणाऱ्या उमेदवाराला मतदान करू नये. भ्रष्टाचारी लोकांच्या हाती जिल्हा बँक देऊ नये, असे राणे यांनी सांगितलं. तसेच, जिल्हा बँकेची जिल्हा बँकेची सुत्रं सांभाळली त्यासंदर्भात जिल्हा बँकेची चौकशी करायला लावणार असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील राज्यकर्ते जनतेची कामं करत नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात राज्य सुरक्षित नाही. भ्रष्टाचार करून पैसे सोडवणे हाच महाविकास आघाडी सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे, अशी टीका राणेंनी केली. लघु आणि सुक्ष्म, मध्यम उद्योग खात्याच्या मंत्रालयातून देशाचं उत्पन्न वाढवणं, जीडीपी वाढवून देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जिल्ह्यात उद्योगाचं जाळं बसवणार असल्याचं राणे म्हणाले. आपल्या खात्यातंर्गत येणारं कोअर कार्यालय कणकवलीमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी राणे यांनी सांगितलं.
नारायण राणे यावेळी चांगलेच भडकले आहेत. मी सर्व लक्षात ठेवतो. मी काही विसरत नाही. मी जबाबदार पदावर आहे, म्हणून अशी विधानं राणेंनी केली आहेत. त्यामुळे राणेंना राग का येतो? अशा अर्थात काही करता आल्यास करावं. पत्रकार परिषदेच्या शेवटला देखील राणे चांगलेच भडकले होते. यापुढे जिल्ह्या बाहेरच्या मुद्यांवर मी काहीही बोलणार नाही, असं देखील राणे यांनी स्पष्ट केलं. शिवाय, संसदेतील उत्तरावरून ट्रोल झालात आणि आपल्याकडे राऊत आणि राणे यांच्या दाखवलेल्या प्रतिक्रिया राणेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.