Miss world 2021 Postponed : मिस वर्ल्ड 2021 या स्पर्धेचा (Miss world 2021)  ग्रँड फिनाले  स्थगित करण्यात आला आहे. स्पर्धेतील 17 स्पर्धकांना कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला प्यूर्टो रिको येथे आज (17 डिसेंबर) ही स्पर्धा होणार होती. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मनसा वाराणसी ही करणार आहे. 



मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेच्या आयोजकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, आरोग्य विभाग आणि  मेडिकल एक्सपर्ट्स यांचा सल्ला घेऊन पुढील 90 दिवसांमध्ये पुन्हा या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगातील वेगवेगळ्या देशांमधून लोक येत असतात. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे स्पर्धेचे आयोजक रिस्क घेऊ इच्छित नाही. मिस वर्ल्ड स्पर्धेचे सीईओ जूलिया मोर्ले यांनी लवकरच त्या स्पर्धेसाठी प्यूर्टो रिको येथे परत येतील. 






मानसा वाराणसी करणार भारताचे प्रतिनिधित्व   
हैद्राबादची मनसा वाराणसी मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्यूर्टो रिको येथे गेली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या स्पर्धेकडे आहे.  प्रीमेरा होरा ने द नेशनल न्यूज टुडे या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील 17 स्पर्धकांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 





महत्त्वाच्या बातम्या :


Miss Universe 2021 : 1170 हिऱ्यांचा कोट्यवधींचा मुकूट, बक्षीसांचा पाऊस, मिस युनिवर्स हरनाजला काय काय मिळालं?


Miss universe 2021 : उर्वशी रौतेला 'मिस युनिवर्स' स्पर्धेची परीक्षक, हरनाजच्या विजयानंतर अश्रू अनावर