Maharashtra School Reopen News : राज्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एक डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. जवळपास दोन वर्षानंतर शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत. ही मार्गदर्शक तत्वे कशी असू शकतात. तसेच शाळा सुरू होत असताना शिक्षक आणि पालकांनी नेमकी काय  काय खबरदारी घ्यायला हवी? यासाठी एबीपी माझाने चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांच्याशी खास बातचीत केली आहे. जाणून घेऊयात काय असतील गाईडलाईन्स... 


शिक्षण विभागाने ज्या प्रकारे गुरुवारी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे शिक्षक पालक विद्यार्थी यांनी स्वागत केले पाहिजे. आता या टप्प्यात जेंव्हा आपण शाळा सुरू करतोय तेव्हा बेसिक गाईडलाईन्स त्याच राहतील. मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे, स्वछता पाळणे, शाळेत गर्दी न करणे, सतत सॅनिटाइजेशन आणि हात साफ करणे, असं समीर दलवाई यांनी सांगितलं.  शाळा सुरु होत असताना या मार्गदर्शक सूचनांचा मुख्य मार्गदर्शक सूचना म्हणून पाहतो. त्यामध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही. यामध्ये आपण आता आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पहिली ते सातवीच्या मुलांसाठी स्ट्रिक्ट गाईडलाईन्स करत असताना त्या पाळल्या सुद्धा गेल्या पाहिजेत, याचा सुद्धा विचार करावा लागेल. स्थानिक ठिकाणावरील परिस्थिती पाहून या गाईडलाइन्समध्ये थोडाफार बदल केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. 


कोमोरबीडीटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेतच.लहान मुलांना हृदयाचे विकार आहेत, किडनीचे आजार आहेत, ट्रान्सप्लांट झालेले असेल, त्यांनी शाळेत सध्या येणे टाळले पाहिजे. तुलनेने मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये बघता लहान मुलांमध्ये याचे खूपच कमी संकेत आहेत.  अशा मुलांना त्यांचे डॉक्टर्स शाळेत जावं की नाही या बाबत सांगतील. शिवाय पालक सुद्धा तेवढीच काळजी घेतील. हे सोडून इतर विद्यार्थ्यांनी पालकांनी घाबरण्याची गरज नाही. शाळा सुरू होणे आणि शाळेत मुलांना पाठवणे, हा पालकांचा निर्णय राहील त्याला आपण अनिवार्य केलेले नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता लसीकरण आणि शाळा सुरू होणे याचा काहीही संबंध नाही. लसीकरण जेव्हा सुरू होईल तेंव्हा साईड बाय साईड लहान मुलांना लस दिली जाईल दुसरीकडे शाळा सुरू राहतील, असे समीर दलवाई म्हणाले. 


Maharashtra School Reopen News : शाळा पुन्हा गजबजणार! एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार