Maharashtra Sangli Crime News : सांगतील इस्लामपूर पोलीस स्टेशनमधील (islampur police station) रक्षकच भक्षक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इस्लामपूर पोलीस स्टेशनमधील पोलिसाने (police station) घृणास्पद काम केलं आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं एका तरुणावर अनैसर्गिक संभोग केला. पोलीस कर्मचारी इतक्यावरच थांबला नाही तर संभोग करतानाचा व्हिडीओ देखील केला. पीडित तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भा.द.वि कलम 387,377, 504, 506 प्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं आधी पीडित तरुणाच्या मैत्रिणीकडे शरीरसंबंधची मागणी केली होती. तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला विरोध दर्शवत मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवण्यात  नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणांकडे पैशाची मागणीही केली. तसेच मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवायला देत नसशील तर मी तुझ्यासोबत शरीरसंबंध करणार असे म्हणत, तरुणांवर व्हिडीओ शूट करत अनैसर्गिक संभोग केला. इस्लामपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे पोलिसांचं नाव बदनाम होत आहे.


आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं पीडित तरुणाला व्हिडीओच्या आधारावर धमकी देत पुन्हा संभोगाची मागणी केली होती. या प्रकरानंतर पीडित तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडित तरुणाच्या तक्रारीनांतर आरोपी पोलिसाला अटक करण्यात आली आहे. भा.द.वि कलम 387,377, 504, 506 प्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे, असं इस्लामपुर पोलिस स्टेशनमधील पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितलं. 


हेही वाचा : Pune Crime : पुणे हादरले; मित्राने 16 वर्षीय मुलासोबत केलं अनैसर्गिक कृत्य 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 



संबधित बातम्या :


Airtel Prepaid Pack Price Hike : एअरटेलचा ग्राहकांना मोठा धक्का, 20 रुपयांपासून 501 रुपयांपर्यंतचे प्लॅन महागले
Nawab Malik : नवाब मलिकांचा 'फोटोबॉम्ब', समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला पोस्ट