Airtel Prepaid Pack Price Hike :  टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलनं आपल्या प्रीपेड युजर्सला मोठा धक्का दिलाय. एअरटेलनं आपल्या 20 रुपयांपासून 501 रुपयांपर्यंतच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये तब्बल 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना महागाईची झळ बसणार आहे. नवीन दरवाढ 26 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहे. याआधी जुलै महिन्यात एअरटेल कंपनीने पोस्टपेड प्लॅन्समध्ये दरवाढ केली होती. 


79 चा प्लॅन 99 रुपयांना -
आता 28 दिवसाच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 99 रुपयांपासून सुरु होणार आहे. याआधी हा प्लॅन 79 रुपयांना होता. यामध्ये 25 टक्केंनी वाढ करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 99 मिनिटांच्या टॉकटाइमसह 200 एमबी डेटा मिळतोय. कंपनीने जुलै महिन्यात 49 रुपयांचा प्लॅन बंद केला होता.  99 रुपयांच्या या प्लॅनमध्ये एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही.  




149 चा प्लॅन 30 रुपयांनी महागला –
28 दिवसांच्या वैधतेसह असणारा 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 रुपयांनी वाढ झाली आहे. या प्लॅनसाठी आता 179 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळतात. शिवाय दोन जीबी डेटाही मिळतो.  


219 चा प्लॅन 265 रुपयाला –
एअरटेलचा सर्वाधिक प्रसिद्ध असलेला 219 रुपयांचा प्लॅन आता 265 रुपयांना झालाय. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएससह 1 जीबी डेटा मिळतो. शिवाय अमर्याद कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 
 
हे दोन प्लॅनही महागले -
249 रुपये किंमतीचा प्लॅन 50 रुपयांनी महागला आहे. आता या प्लॅनसाठी 299 रुपये मोजावे लागणार आहे. या प्लॅनमध्ये अमर्याद कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस आणि दीड जीबी डेटा दिला जातो.  याशिवाय 379 रुपयांच्या प्लॅनसाठी 455 रुपये मोजावे लागणार आहेत. 84 दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये अमर्याद कॉलिंगसह प्रति दिवस 100 एसएमएस दिले जातात. तसेच 6 जीबी डेटाही दिला जातो.  


हा प्लॅन 121 रुपयांनी महागला
598 रुपयांच्या प्लॅन 121 रुपयांना झालाय. त्यामुळे या प्लॅनसाठी युजर्सला आता 719 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये दररोज दीड जीबी डेटा आणि 100 एसएमएस तसेच अमर्याद कॉलिंगची सुविधा दिली जाते.