महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 418 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 428 नव्या रुग्णांची नोद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 66 लाख 7 हजार 954 वर पोहचली आहे. यापैकी 64 लाख 45 हजार 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 40 हजार 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97. 54 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात सध्या 1 लाख 71 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 896 वैद्यकीय संस्थांमध्ये उपचार घेत आहेत. 


कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याचा तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 4 लाख 74 हजार 928 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9 कोटी 62 लाख 83 हजार 551 लस देण्यात आल्या आहेत. यात पहिला आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. 


संबंधित बातम्या-