मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 327 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 365 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,32,114 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4151 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1412 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 39 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
राज्यात आज 1418 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1418 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 45 हजार 454 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के आहे. राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3929 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 18 हजार 748 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,71, 200 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 896 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 6, 23, 16, 200 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात गेल्या 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण काहीसं जास्त आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 733 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 56 हजार 386 वर पोहोचली आहे